कुडाळेश्वर मंदिरात उद्या ‘त्रिपुरारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळेश्वर मंदिरात उद्या ‘त्रिपुरारी’
कुडाळेश्वर मंदिरात उद्या ‘त्रिपुरारी’

कुडाळेश्वर मंदिरात उद्या ‘त्रिपुरारी’

sakal_logo
By

60452
श्री देव कुडाळेश्वर

कुडाळेश्वर मंदिरात उद्या ‘त्रिपुरारी’
कुडाळ, ता. ५ ः येथील श्री कुडाळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सोमवारी (ता. ७) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव, महादीप पूजन आणि प्रज्वलन, त्यानंतर पारंपरिक पद्धतीने दीपस्तंभावर महादीप चढविण्यात येणार आहे. सायंकाळी विशेष करमणुकीचा कार्यक्रम, श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळनिर्मित ऑर्केस्ट्रा ‘स्वरगंधार’ सादर करण्यात येणार आहे. मित्रमंडळाच्या लहान-मोठ्या कार्यक्रमांत वादयवृंदाच्या संचामध्ये हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा. या उत्सवास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.