पोलिसांशी हूज्जत प्रकरणी नीलेश राणे निर्दोष मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांशी हूज्जत प्रकरणी
नीलेश राणे निर्दोष मुक्त
पोलिसांशी हूज्जत प्रकरणी नीलेश राणे निर्दोष मुक्त

पोलिसांशी हूज्जत प्रकरणी नीलेश राणे निर्दोष मुक्त

sakal_logo
By

पोलिसांशी हुज्जत प्रकरणी
नीलेश राणे निर्दोष मुक्त
ओरोस, ता. ५ ः पोलिसांशी हुज्जत घालत जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांची आज जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नीतेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. या दरम्यान उच्च न्यायालयाकडून आमदार नीतेश राणेंना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा दिला होता. यावेळी आमदार राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून त्यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करून पोलिसांशी हुज्जत घालत जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणे यांच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याची सुनावणी आज जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए. एम. फडतरे यांच्यासमोर पूर्ण झाली. न्यायाधीश फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात माजी खासदार राणे यांच्यासह भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये यांचा समावेश होता. या सर्वांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. याकामी ॲड. संग्राम देसाई, अशपाक शेख यांनी काम पाहिले.