जनतेच्या मनात स्थान मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेच्या मनात स्थान मिळवा
जनतेच्या मनात स्थान मिळवा

जनतेच्या मनात स्थान मिळवा

sakal_logo
By

60551
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पोलिस यंत्रणेच्या कामकाजाचा संगणकीय सादरीकरणाद्वारे आढावा घेताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण. सोबत पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अन्य अधिकारी.

जनतेच्या मनात स्थान मिळवा

पालकमंत्री चव्हाण; सिंधुदुर्गनगरीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

ओरोस, ता. ५ ः पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलिसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांनी आपल्या सेवाकाळात चांगली सेवा, कर्तव्ये करून जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे. सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ होऊन तुमच्या कुटुंबीयांसमोर तुम्ही सेवाकाळात केलेल्या कामांचा उल्लेख करीत वक्त्यांनी तुमचा गौरव केला पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आढावा बैठकीत व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरवातीला पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी रोप देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संगणकीय सादरीकरण करून पोलिस दलाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘पोलिसांना दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. निसर्गसंपन्न जिल्ह्यातील जनतेला शांततेचे जीवन अपेक्षित आहे. त्याला साजेसे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. तरुणाईला व्यसनापासून, विशेषतः अमली पदार्थांपासून रोखण्यासाठी परिवर्तनाचे काम करा. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या पिढीला वाचविण्यासाठी वडीलधाऱ्या अधिकारांचा वापर करा. नियमबाह्य गोष्टींवर वेळीच नियंत्रण ठेवा.’’ पोलिस विभागाच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील. प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.