अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल
अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

sakal_logo
By

( टुडे पान ३ )

rat६p१५.jpg ः

६०६४३

गुहागर ः सेंद्रीय उत्पादक कंपनीत उपलब्ध असलेले बियाणे.

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

सेंद्रीय उत्पादक कंपनी ; गुहागरात अनोखा उपक्रम

गुहागर, ता. ७ ः कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातून मिळणारे उत्पादन हमीभावात याच कंपनीला विकायचे, अशी अनोखी योजना गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने आणली आहे. सध्या ही योजना कंपनीच्या सभासदांपुरती मर्यादित आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी यांनी दिली.
या योजनेची माहिती देताना जोशी म्हणाले, गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने कोकण सदाबहार चवळी, कोकण वाल म्हणजेच कडवा वाल आणि दापोली १ जातीचे कुळीथ या तीन कडधान्यांचे बियाणे सभासदांसाठी उपलब्ध केले आहे. उत्पादक कंपनीच्या सभासदांना हे बियाणे निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. यापैकी कोणत्याही कडधान्याची लागवड केल्यानंतर येणारे सर्व उत्पादन विकण्यासाठी ग्राहक शोधण्याची गरज सभासद शेतकऱ्यांना पडणार नाही. आधी हमीभाव जाहीर करू मग आमच्या सभासद शेतकऱ्यांकडून सर्व उत्पादन विकत घेण्याची व्यवस्था कंपनीने केली आहे. शेतमालच्या विक्रीची हमी असल्याने शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतील.
या योजनेची माहिती गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीच्या सर्वच्या सर्व ३१० शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम सध्या सर्व संचालक करत आहेत. पहिलाच प्रयोग असल्याने सध्यातरी ही योजना आम्ही कंपनीच्या सभासदांपुरती मर्यादित ठेवली आहे. ज्या सभासदांना योजनेची अधिक माहिती हवी आहे त्यांनी गुहागर सेंद्रिय उत्पादक (ऑरगॅनिक प्रोड्युसर) कंपनीच्या शृंगारतळी पोस्ट ऑफिससमोर असलेल्या कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन मंदार जोशी यांनी केले.