लक्षात न राहणेः एक समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्षात न राहणेः एक समस्या
लक्षात न राहणेः एक समस्या

लक्षात न राहणेः एक समस्या

sakal_logo
By

लोकल टू ग्लोबल .............लोगो

फोटो ओळी
-rat6p16.jgp
60644
डॉ. गजानन पाटील
-----------
इंट्रो
आजकाल बहुसंख्य पालक मुलाच्या शिक्षणासाठी नेहमी सतर्क राहतात. मुलांना वेगवेगळे क्लासेस, सल्लागार तज्ञमंडळीचे मार्गदर्शन, अभ्याससत्रे यावर भर देतात. ते चुकीचं आहे अशातलं नाही. मुलाच्या शैक्षणिक विकासासाठी किमान सुशिक्षित पालक फार सतर्क असताना दिसतात. आमच्यावेळी असा पालकांचा दृष्टिकोन नव्हता. त्यांना कोणी सांगावे याची पण सोय नव्हती किंवा तितका त्यांनी मुलांच्या भवितव्याचा विचारही केला नसेल. आज मात्र परिस्थिती अगदी उलट झाली आहे. मुलाच्या अगोदर पालकच त्याच्या भवितव्याचा विचार मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. आम्हाला जे जमलं नाही ते मुलांनी करावं, असा त्यांचा अट्टाहास निर्माण झाला. या सगळ्यांमधून मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊ लागल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते. अगदीच जास्त भारीतला क्लास घेता आला नाही तर आई-वडील पाल्याला घरीच अभ्यासाला बसवून त्याचा अभ्यास घेतात.
- डॉ. गजानन पाटील
------------
लक्षात न राहणेः एक समस्या
क्लासची फी परवडत नाही, ऑनलाइन क्लास शक्य होत नाही असे पालक आपल्या मुलाची उजळणी घरीच करून घेतात. त्या वेळी असे पालक मुलांना लक्षात राहात नाही याची तक्रार घेऊन डाएटला येतात. अनेकवेळा उत्तरे पाठ करून घेऊनही मुले ते विसरतात, अशी त्यांची शंका असते. मुलांच्या लक्षात राहण्यासाठी डाएट रत्नागिरीने एक पद्धत तयार केली. ज्या योगे पालक आपल्या पाल्याला संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्याप्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न घरच्या घरी करू शकतात. परीक्षेच्यावेळी मुले खूप चांगले शिकवलेले धडे विसरतात आणि पेपरमध्ये अनेक प्रश्न सोडतात. त्याचा परीक्षेतील गुणांवरही परिणाम होतो. मूल शिकवल्यानंतर लगेचच अभ्यासक्रम किंवा अध्याय विसरले तर त्याच्यावर पालक रागवतात. तर अशा मुलांसाठी काही पद्धती शोधल्या असून त्याचा उपयोग करून पाहिल्यावर त्याचा परिणाम दिसेल.

पहिली पद्धत म्हणजे मुलावर लक्षात राहात नाही म्हणून रागावू नका तर मुलाला घरी शिकवताना त्या विषयाबद्दल समजावून सांगितले पाहिजे. बऱ्याचदा मुलांना विषय समजत नाही तेव्हा पालक रागवतात. तुला येत नाही काय गाढवा ! कशाला शाळेत जातोस ? हमाल हो ! अशी विधाने करून त्याची उमेद मारून टाकतात. या पद्धतीमध्ये पालकांनी मुलांवर रागवायचे नाही. त्याला शक्य असेल तेवढे समजून द्यायचे. त्याच्याशी प्रेमाने वागायचे. नाही आले तर राहू दे. थोडा वेळ खेळ मग अभ्यास कर, असे म्हणायचे. या पद्धतीने मुलं त्याच्या गतीने शिकते.

दुसरी पद्धत म्हणजे अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर बंद करा; पण काही पालक हे पाठ कर ते पाठ कर, असे मुलाच्या मागे टुमणे लावतात; परंतु त्या पाठांतराने ज्ञानाचा विस्तार होत नाही तसेच जर मुल लक्षात ठेवलेला मजकूर विसरले तर तो परीक्षेत त्या विषयावर एक ओळदेखील लिहू शकणार नाही. म्हणून मुलांना पाठांतर करायला भाग पाडू नका तर त्याला लक्षात ठेवण्याच्या युक्त्या सांगा. त्यासाठी मुलांना उदाहरणांतून शिकवण्याचा प्रयत्न करावा. विषय लक्षात ठेवण्यासाठी शिकवताना, तो विषय मुलाच्या जीवनाशी निगडित असल्याचे सांगा. जेव्हा मूल त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील गोष्टी समजते तेव्हा त्याला धडा आठवतो. जसे की, मुले अनेकदा इतिहासाच्या विषयात तारखा विसरतात; पण जर आपण त्याच्या वाढदिवसाच्या तारखेशी संबंधित इतिहास शिकवला तर त्याच्या तारखा लक्षात राहतील. कधीतरी गाण्यासारखी आठवण करून यावी. मुलांना चित्रपटातील एखादे गाणे पूर्णपणे आठवते; पण धडा आठवताना ते विसरतात, असे दिसून येते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना एखाद्या गोष्टीची आठवण करून द्याल तेव्हा त्यांना कविता किंवा गाणे गाऊन शिकवा. जेव्हा मुले विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी इत्यादी विषयांवर ओळींच्या स्वरूपात गाणे ऐकतात आणि गुणगुणतात तेव्हा त्यांना धडा लक्षात ठेवणे सोपे होते. अशा पद्धतीमुळे घरच्या घरी मुलाला अभ्यासाची गोडी लागून लक्षात राहण्यामध्ये सुधारणा होते.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ , मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)