बँकिंग व्यवहारात सतर्कता महत्त्वाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकिंग व्यवहारात सतर्कता महत्त्वाची
बँकिंग व्यवहारात सतर्कता महत्त्वाची

बँकिंग व्यवहारात सतर्कता महत्त्वाची

sakal_logo
By

60671
कुडाळ ः सतर्कता जागरुकता सप्ताह कार्यक्रमात महाबँकेचे झोनल मॅनेजर सुजित नायक, डेप्युटी झोनल मॅनेजर आनंद डिंगणकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

बँकिंग व्यवहारात सतर्कता महत्त्वाची

सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार; कुडाळमध्ये महाबँकेतर्फे जागरुकता सप्ताह

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः प्रत्येकाने बँकिंग किंवा अन्य क्षेत्रात व्यवहार करताना सतर्क असले पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे प्रतिपादन सायबर सेल सिंधुदुर्गचे सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी महाबँकेने आयोजित केलेल्या सतर्कता जागरुकता सप्ताह कार्यक्रमात केले.
भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत उपक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने येथील हॉटेल कोकण स्पाईसच्या सभागृहात सतर्कता जागरुकता सप्ताहाचे आयोजन महाबँकेचे गोवा पणजी झोनल मॅनेजर सुजित नायक, डेप्युटी झोनल मॅनेजर आनंद डिंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी अॅड. अजित भणगे, अॅड. विलास पांगम, अॅड. अमोल सामंत, अॅड. दीपक अंधारी, अॅड. सुरेंद्र माळगावकर, अॅड. अरुण पणदूरकर, अॅड. अमोल मालवणकर, महेश पिंगुळकर, मुकुंद पेडणेकर, अनुराधा वराडकर, शीतल ढोलम, राजीव चिंदरकर, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, वैष्णवी राऊळ, अॅड. समीर कुलकर्णी, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी उमेश नाडकर्णी, चंद्रकांत निर्मल, लांजा शाखाधिकारी प्रमोद विसपुते, कुडाळ शाखाधिकारी ब्रजेशकुमार, सुभाष सुर्वे, मीलन कापडिया, खारेपाटण शाखाधिकारी मनीषकुमार, कणकवली शाखाधिकारी आर. श्रीकृष्णा गौड, पाट परुळे शाखाधिकारी पी. एस. पंडित, अतुल साळुंके, मालवण शाखाधिकारी मंदार पाटील, कृष्णा दिलेवार, जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील वकील, पॅनल बोर्ड, बँकमित्र सखी आदी उपस्थित होते.
यावेळी सुतार महणाले की, काही वर्षांपासून मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत आहे. आमिषे, प्रलोभने दाखविण्याची कोणतीही माहिती बँकेकडून दिली जात नाही. आपण माहिती मागितली तरच बँक माहिती देते. राजस्थान, दिल्ली, केरळ, भरतपूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच याबाबत घ्यावयाची दक्षता, एटीएम, विमा विषयक होणारी फसवणूक याबाबत सुतार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातही आर्थिक फसवणुकीबाबत जनजागृती चळवळ सुरू करण्याची गरज अॅड. पांगम, अॅड. भणगे, अॅड. पणदूरकर, अॅड. सामंत यांनी व्यक्त केली. प्रमोद विसपुते (लांजा) यांनी आभार मानले.
--
महाबँकेचे नेहमीच सहकार्य
बँकेच्या माध्यमातून कोणत्याही ग्राहकाची फसवणूक होऊ नये, यासाठी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान, सतर्कता जागरूकता सप्ताहचे आयोजन केले होते. बँकिंग क्षेत्रात शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी बँक अधिकारी, कर्मचारी वर्ग कटिबद्ध आहे. शेतकी, व्यावसायिक तसेच इतर उद्योगांना कर्ज देण्यासाठी महाबँकेचे नेहमीच सहकार्य राहील, अशी माहिती डिंगणकर यांनी दिली.