ठाकरे गटाचा कुडाळमध्ये जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे गटाचा कुडाळमध्ये जल्लोष
ठाकरे गटाचा कुडाळमध्ये जल्लोष

ठाकरे गटाचा कुडाळमध्ये जल्लोष

sakal_logo
By

60673
कुडाळ ः येथे विजयोत्सव साजरा करताना कार्यकर्ते.

ठाकरे गटाचा कुडाळमध्ये जल्लोष
कुडाळ ः अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. कुडाळ शिवसेना शाखेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, उदय मांजरेकर, किरण शिंदे, अमित राणे, बंड्या कोरगावकर, साहिल शिरसाट, सडवेलकर, सतीश कुडाळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.