मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

sakal_logo
By

टुडे पान २ साठी

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

उद्या मतदार यादी ; आज हरकतीचा अखेरचा दिवस

रत्नागिरी, ता. ७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला. बुधवारी (ता.९) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उद्यापर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
दावे व हरकती २६ डिसेंबरपर्यंत निकालात काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारीला होईल. महिला, दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरे १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर घेण्यात येणार आहे. तृतीय पंथीय व्यक्तीं, देहविक्री करणा-या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरे. २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबरला होतील. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी व नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी, मतदार यादीतील नोंदीला आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा, याकरिता सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन १० नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या वेळी मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी, तपासण्यासाठी व यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे. आधार जोडणीचा उपक्रमही त्याचवेळी राबविण्यात येणार आहे.
मतदार यादीची प्रारुप प्रसिद्धी ९ नोव्हेंबरला झाल्यानंतर नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नोंदीची तपासणी करावी. नोंदीची तपासणी/पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in / या संकेतस्थळावरही करता येईल. यामध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा नवीन मतदारांसाठी नमुना ६, मतदार यादीतील नावाची वगळणीकरिता नमुना ७ व मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्ती/स्थलांतरित/दिव्यांग/मतदान ओळखपत्र मिळणेकरिता नमुना ८ हे घरबसल्या ऑनलाईन एनव्हीएसपी या संकेतस्थळावर किंवा मतदार मदत अॅपवर अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
ऑफलाईन पध्दतीने अर्ज संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात देता येतील. २०२३ पासून दरवर्षी १ जानेवारी, ०१ एप्रिल, ०१ जुलै व ०१ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापूर्वी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे. तरी या उपक्रमामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे अशाही मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी, असे आवाहन केले आहे.