गणपतीपुळ्यात साडेआठ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळ्यात साडेआठ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
गणपतीपुळ्यात साडेआठ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

गणपतीपुळ्यात साडेआठ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

sakal_logo
By

rat६p२२.jpg
६०६५१
रत्नागिरी : गणपतीपुळे येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, गजानन पाटील, बाबू म्हाप, प्रकाश साळवी आदी.

गणपतीपुळ्यात साडेआठ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन ; काम २ वर्षांत पूर्ण होणार
रत्नागिरी, ता. ६ : श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत गणपतीपुळे गावाकरिता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे या कामाचे भूमीपूजन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या कामासाठी ८ कोटी ५३ लाख २ हजार ४३० रुपयाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
या कामांर्गत इंटिग्रेटेड वेटलॅंड टेक्नॉलॉजीवर (IWT) आधारित ७ लाख ५० हजार लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा समावेश आहे. गणपतीपुळे शहरात भूमीगत गटार वितरण व्यवस्थेसाठी १५० ते २५० मि.मी. व्यासाचे ८१७९ मी. लांबीचे एचडीपीई डबल वॉल कोरगटेड प्रकारचे पाईप्स टाकण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. काम पूर्ण झाल्यावर मक्तेदारामार्फत पुढील पाच वर्षासाठी ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली योजनेची देखभाल दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद सुर्वे, उपअभियंता ए. डी. चौगुले, गणपतीपुळेच्या सरंपच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार आदी मान्यवर उपस्थित होते.