भजन स्पर्धेत वडखोलचे ‘सद्गुरुनाथ’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भजन स्पर्धेत वडखोलचे ‘सद्गुरुनाथ’ प्रथम
भजन स्पर्धेत वडखोलचे ‘सद्गुरुनाथ’ प्रथम

भजन स्पर्धेत वडखोलचे ‘सद्गुरुनाथ’ प्रथम

sakal_logo
By

60688
निरवडे : विजेत्या सद्गुरू वडखोल मंडळाला गौरविताना परीक्षक योगेश प्रभू, रुपेंद्र परब, सुभाष मयेकर आदी.

वडखोलचे ‘सद्गुरुनाथ’ भजन स्पर्धेत प्रथम

निरवडेत आयोजन; पिंगुळी द्वितीय, वैभववाडी तृतीय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे-कोनापाल येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत तुळस वडखोल येथील सद्गुरुनाथ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक पिंगुळी येथील महापुरुष मंडळाने, तर तृतीय क्रमांक वैभववाडी येथील दत्तकृपा मंडळाला मिळाला. उत्तेजनार्थ विभागून प्रथम मोरेश्वर भजन मंडळ नेरुर, द्वितीय विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले यांना देण्यात आला.
या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते. वैयक्तिक बक्षिसांमध्ये उकृष्ट गायक प्रसाद आमडोसकर (पिंगुळी), हार्मोनियम-राजेश गुरव, पखवाज-शुभम गावडे, तबला-गौरव पिंगुळकर, झांज-चिन्मय लाड, कोरस- सद्गुरुनाथ तुळस, शिस्तबध्द संघ-गोठण भजन मंडळ वजराट यांना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निरवडे माजी सरपंच सुभाष मयेकर, जालंधर परब, बाबी नेमळेकर, एकनाथ जाधव, शिवराम जाधव, संतोष माळकर, प्रशांत मेस्त्री, रुपेश मयेकर, सतीश वारंग आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, भजनप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. परीक्षक म्हणून रुपेंद्र परब, योगेश प्रभू यांनी काम पाहिले. सतीश वारंग यांनी सूत्रसंचालन केले.