आचऱ्यात ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचऱ्यात ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद
आचऱ्यात ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद

आचऱ्यात ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद

sakal_logo
By

60689
पक्षीगणनेत सहभागी झालेले पक्षीमित्र.
60690
60691
60692
पक्षीगणनेत आढळलेले काही पक्षी.

आचऱ्यात ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद

‘रानमित्र’ची मोहीम; स्थानिक, स्थलांतरीत पक्षांचा समावेश


सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ६ ः पक्षीसप्ताहाचे औचित्य साधून रानमित्र टुरिझम आचरातर्फे आयोजित करण्यात आलेला मालवण शहरातील पक्षीगणनेचा कार्यक्रम काल (ता. ५) उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत मालवणमधील सागरी महामार्ग परिसर (आचरा रोड), आडवण परिसर आणि गणेश मंदिर ते रॉक गार्डन या परिसरात पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत एकूण ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद करण्यात आली.
लहान शिंजिर, छोटा गोमेट, चिमणी, मैना, टोई पोपट, ठिपकेवाली नाचण, बलाकचोच खंड्या, हिरवी ढोकरी, स्वर्गीय नर्तक या स्थानिक प्रजातींसोबतच तपकिरी डोक्याचा कुरव, पल्लासचा कुरव, छोटा कंठेरी चिखल्या, सामान्य तुतारी, सामान्य गप्पीदास आणि युरोपियन निलपंख यांसारखे स्थलांतरित पक्षीही आढळून आले. या पक्षीगणनेसाठी रानमित्र टुरिझमचे शिल्पन गावकर, डॉ. श्रीकृष्ण मगदूम, स्वप्नील गोसावी, अॅलिस्टर फर्नांडिस, सुशांत सावंत, सिद्धेश देवधर आणि तेजस सामंत उपस्थित होते. त्याबरोबरच मालवण वायरी येथील दर्शन वेंगुर्लेकर आणि खानविलकर, तर मालवण येथील चंद्रवदन कुडाळकर व स्वाती पारकर उपस्थित होते. या प्रसंगी कोल्हापूरहुन श्री व सौ. मिलिंद गडकरी हे पक्षीप्रेमीही उपस्थित होते.