दांडी किनाऱ्यावरून मच्छिमार जाळी चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दांडी किनाऱ्यावरून 
मच्छिमार जाळी चोरीस
दांडी किनाऱ्यावरून मच्छिमार जाळी चोरीस

दांडी किनाऱ्यावरून मच्छिमार जाळी चोरीस

sakal_logo
By

दांडी किनाऱ्यावरून
मच्छीमार जाळी चोरीस
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : दांडी-गवंडीवाडा किनाऱ्यावरून मच्छीमारांची मासेमारी जाळी चोरीला गेल्याची घटना शनिवार (ता. ५) घडली. यात मच्छीमारांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दांडी-गवंडीवाडा किनाऱ्यावर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या शेडमध्ये मच्छीमार भूषण जुवाटकर, राजू मोर्वेकर, सत्यवान मोरजे यांनी नेहमीप्रमाणे आपली मासेमारी जाळी ठेवली होती; मात्र शनिवारी सकाळी शेडमधून जाळी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती भाऊ मोरजे यांनी दिली.