बाळाचे प्राण वाचविणाऱ्या चालक वाहकाचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळाचे प्राण वाचविणाऱ्या चालक वाहकाचा सत्कार
बाळाचे प्राण वाचविणाऱ्या चालक वाहकाचा सत्कार

बाळाचे प्राण वाचविणाऱ्या चालक वाहकाचा सत्कार

sakal_logo
By

बाळाचे प्राण वाचविणाऱ्या
चालक वाहकाचा सत्कार
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी आगारातून सुटलेली एसटी बस थेट कोणत्याही थांब्यावर न थांबवता रुग्णालयात नेण्यात आली. यामुळे एका लहान बाळाचे प्राण वाचले आहेत. या संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाईमार्गे बीडला जात होती. त्या वेळी नेकनूर ते बीड प्रवास करताना एका महिलेच्या एक वर्षांच्या लहान मुलाला ताप जास्त असल्याने हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी रत्नागिरी आगरातील कर्तव्यदक्ष वाहक महादेव फड यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी चालकाला कुठेच न थांबता थेट रुग्णालयाच्या आवारात बस नेण्यास सांगितले. त्यामुळे या बाळावर तातडीचे उपचार झाले. जर १० मिनिटे उशीर झाला असता तर काही उपयोग झाला नसता. वाहक, चालकाच्या या कार्यतत्परतेमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याबद्दल रत्नागिरीचे आगार व्यवस्थापक पाटील, स्थानक प्रमुख प्रभुणे, शिंदे, पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.