दीड मिनिटात 2 किमीचा कशेडी बोगदा पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड मिनिटात 2 किमीचा कशेडी बोगदा पार
दीड मिनिटात 2 किमीचा कशेडी बोगदा पार

दीड मिनिटात 2 किमीचा कशेडी बोगदा पार

sakal_logo
By

rat६p१७.jpg
L६०६४५
चिपळूणः पूर्णत्वास जात असलेल्या कशेडी बोगद्याचे काम.
rat६p१८.jpg ः
६०६४६
भोगाव येथे मलेशियन तंत्रज्ञानाद्वारे पुलाची उभारणी होत आहे. (नागेश पाटील ः सकाळ छायाचित्रसेवा)
----------------
कशेडी बोगदा दीड मिनिटाचा
मार्चपर्यंत एक बोगदा सुरू करण्याचे नियोजन; ८० टक्के काम पूर्ण, रस्त्याचे बाकी
चिपळूण, ता. ६ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वात मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांच्या कामाने वेग घेतला आहे. बोगद्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून केवळ काँक्रिट रस्त्याचे काम बाकी आहे. घाटातील एकूण १३ किमीच्या लांबीत २ किमीचे समांतर दोन बोगदे आहेत. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्णत्वास गेले असून मार्चपर्यंत एक बोगदा सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या बोगद्यामुळे ४ किमीचे अंतर वाचणार असून तासाभराच्या वेळेची बचतदेखील होणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ब्लॅकस्पॉट ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाचा चढ आणि उतारात कारचालकांचा तासाभराचा कालावधीत जातो. यावर उपाय म्हणून कशेडीत बोगदा करण्याचे ठरले. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये संबंधित कंपनीस बोगद्याच्या कामाचा ठेका मिळाला. पहिल्या टप्प्यात कोरोना परिस्थितीमुळे मनुष्यबळ न मिळाल्याने कामाला गती मिळाली नाही. कशेडी बोगदा आणि रस्त्यासाठी एकूण ४४१ कोटीचे अंदाजपत्रक आहे. ये-जा करण्यासाठी स्वतंत्र प्रत्येकी २ किमीचे बोगदे आहेत. एकूण १३ किमीचा हा प्रकल्प आहे. बोगद्याची उंची १२ मीटर असून तो १४.५ मीटर रूंद आहे. एकावेळी ३ वाहने सहजरित्या बोगद्यातून जाऊ शकतात. भविष्यातील अंदाज घेत बोगद्यात तीनपदरी रस्ता केला आहे. बोगद्यात येणारे पाणी गटाराच्या माध्यमातून बाहेर काढले आहे.
बोगद्यात ६ ठिकाणी अंतर्गत कनेक्टिव्हिटी आहे. एखाद्या बोगद्यात आयत्यावेळी बिकट प्रसंग उद्भवल्यास दुसऱ्या बोगद्यात वाहतूक वळवण्याची सुविधा ६ ठिकाणी आहे. ९०च्या स्पीडने येथे गाडी चालवता येणार असून केवळ सव्वा ते दीड मिनिटात २ किमीचा बोगदा कारने पार करता येणार आहे. बोगद्यात आणीबाणीवेळी पार्किंग सुविधादेखील आहे. शिवाय बोगद्यामध्ये विजेचे दिवे, सीसीटीव्ही, फायरफायटिंग अशा सुविधा आहेत.
सद्यःस्थितीला या प्रकल्पाचे ८० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. १३ किमीच्या या अंतरामध्ये ७ लहान पूल, ५ मोठे पूल, १० मोरीवरील पूल झाले आहेत. भोगावच्या ठिकाणी मलेशियन तंत्रज्ञानाद्वारे २४ मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. अल्ट्रा हाय परफॉर्मन्स स्टील फायबर काँक्रिट असलेला हा पूल आहे. बूमरच्या साह्याने बोगद्यासाठी खोदाई करण्यात आली. बोगद्याचे आतील बहुतांशी काम झाले असून केवळ रस्त्याचे काम बाकी आहे. त्यामुळे मार्चअखेरीस कशेडीतील एक बोगदा खुला करण्यावर भर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
चौकट
एक नजर
२ किमीचे ४ बोगदे
८० टक्के काम पूर्णत्वास
४ किमीचे अंतर वाचणार
कारने ४५ मिनिटे वेळ वाचणार
अवजड वाहनांची तासभर बचत