राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय नगर प्रदक्षिणा सोहळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय नगर प्रदक्षिणा सोहळ्यात
राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय नगर प्रदक्षिणा सोहळ्यात

राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय नगर प्रदक्षिणा सोहळ्यात

sakal_logo
By

rat6p36.jpg
60713
पंढरपूरः येथे कार्तिकी एकादशी यात्रेला गेलेल्या वारकऱ्यांनी दत्तघाट ते पुंडलीक मंदिर नगर या प्रदक्षिणा काढली. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते.


पंढरपुरातील नगरप्रदक्षिणेत राजापूरचे भाविक
विठू नामाजा गजरात सहभाग; अडीज हजार भाविकांची हजेरी
राजापूर, ता. ६ ः राजापूर तालुका वारकरी सांप्रदायाच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दशमी दिवशी आयोजित तांबडा मारूती दत्त घाट ते पुंडलीक मंदिर अशा नगर प्रदक्षिणा सोहळ्यात तालुक्यातुन पंढरपूरला गेलेल्या सुमारे दोन ते अडीज हजार भाविकांनी उपस्थिती लावली. अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि विठू नामाजा गजर करत हा प्रदक्षिणा सोहळा पार पडला. तालुक्यातील वारकऱ्यांनी विठूरायाच्या नामाचा गजर करत पंढरपूर भक्तीनगरीत एक वेगळा आदर्श निर्माण केला.
राजापूर तालुक्यातून पंढरपूर येथे कार्तिकी वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढत असून यात्रेच्या नियोजनासाठी यात्रेपूर्वी राजापूर तालुक्यातील वारकरी मंडळीची बैठक पार पडली होती. या बैठकीत संप्रदायाच्या वतीने नगर प्रदक्षिणा सोहळयाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे हा सोहळा पार पडला.या सोहळ्यात तालुक्यातील सर्व भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सद्‍गुरु भाई महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही नामदिंडी तथा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. या सोहळयात नंदकुमार पावसकर, तुकाराम बावदाणे, अनंत सरवणकर, पप्पू साळवी, सुरेश मेस्त्री, महादेव जानस्कर, संतोष बावकर, तुकाराम धांगट, सखाराम मांडवे, नामदेव नागरेकर, चंद्रकांत पळसमकर, हरि कदम, बाबू सरफरे, काशिनाथ सोरप, संतोष चौगुले, बंडया बेर्डे, सचीन गुरच्, पप्पू सावंत, संतोष इंगळे, पर्शुराम भालेकर आदी मंडळीनी पुढाकार घेतला.
यामध्ये याच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य व भाविक मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. या प्रदक्षिणा सोहळयात विठ् नामाजा गजर करत समस्त राजापूरकरांनी भक्तीचा आणि एकतेचा जणू संदेशच दिला.