महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार भागवतांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार भागवतांना
महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार भागवतांना

महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कार भागवतांना

sakal_logo
By

rat6p35.jpg
60712
सदानंद भागवत

भागवतांना महासंस्कृती
सन्मान कोकण पुरस्कार
१० नोव्हेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार प्रदान
साडवली, ता. ६ : महासंस्कृती व्हेंचर पुणे यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या महासंस्कृती सन्मान कोकण पुरस्कारासाठी देवरुख येथील सामाजिक बांधिलकी जपणारे निस्वार्थी कार्य करणारे सदानंद भागवत यांची निवड केली आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोकणातील वारसा जतन करणे, नव्या पिढीला इतिहास ठावुक व्हावा या हेतुने कार्य करणे व सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी देवरुखसारख्या ग्रामीण भागात राहुन परदेशातील नोकरी सोडुन फक्त सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे सदानंद भागवत यांच्या कार्याची दखल महासंस्कृतीने घेतली आहे. सदानंद भागवत हे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असुन त्यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली आहे. देवरुख सारख्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. रोजगाराच्या अनेक संधी अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन त्यांनी निर्माण केल्या आहेत. विविध प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देवरुख शहरातुन, तालुका, जिल्हा स्तरावरुन सदानंद भागवत यांचे अभिनंदन होत आहे.