डॉ. अनिता आंबोकर नेट परिक्षा मराठीतून पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अनिता आंबोकर नेट परिक्षा मराठीतून पात्र
डॉ. अनिता आंबोकर नेट परिक्षा मराठीतून पात्र

डॉ. अनिता आंबोकर नेट परिक्षा मराठीतून पात्र

sakal_logo
By

( पान 3 )

ओळी
- rat6p32.jgp-

डॉ. अनिता आंबोकर

डॉ. अनिता आंबोकर नेट ऊत्तीर्ण

रत्नागिरी, ता. ७ ः डॉ. अनिता आंबोकर यांनी नेट परिक्षेत यश प्राप्त केले आहे. नॅशनल एलीजिबिलीटी टेस्ट (नेट) या परीक्षेचे युजीसीने 1 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजन केले होते. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. डॉ. अनिता एकनाथ आंबोकर यांनी ही परीक्षा मराठी विषयासाठी दिली होती. महाविद्यालयस्तरावर प्राध्यापक निवडीसाठी या परीक्षेत पात्र होणे अनिवार्य आहे. अतिशय कठीण समजली जाणारी ही परीक्षा पात्र ठरल्याने डॉ. अनिता आंबोकर यांचे सर्वस्तरांमधून अभिनंदन होत आहे. डॉ. आंबोकर या शिक्षक म्हणून जिल्हा परिषद केंद्र शाळा शिरगाव मराठी (ता. रत्नागिरी) येथे कार्यरत आहेत. त्या प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत आल्यापासून सतत शिक्षण घेत आहेत. डीएसएम, बीए (मराठी व इंग्रजी), एमए (मराठी व इंग्रजी), एमएड, पीएचडी ( मराठी) केली आहे. डॉ. आंबोकर यांच्या चिकाटी, मेहनती व अभ्यासूवृत्तीमुळे ही परीक्षा पात्र ठरू शकले.