परर्शूराम केळकर सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परर्शूराम केळकर सत्कार
परर्शूराम केळकर सत्कार

परर्शूराम केळकर सत्कार

sakal_logo
By

(पान ५ साठी)

rat६p४७.jpg-ओळी

६०७४१
ःरंगभूमी दिनात समर्थ रंगभूमीतर्फे ज्येष्ठ गायक-नट पर्शुराम केळकर यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सोबत अन्य मान्यवर

रंगभूमी दिनी माझा सत्कार होणे भाग्याचे

पर्शुराम केळकर ; समर्थ रंगभूमीतर्फे कलाकाराला मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः यापूर्वीही माझे सत्कार झाले, पण रंगभूमी दिनाच्या दिवशीच माझा सत्कार होणे ही भाग्याची गोष्ट आहे. समर्थ रंगभूमीने आज माझा सत्कार केला आणि एक वेगळा आनंद मला दिला असे भावपूर्ण उद्गार सत्कारमूर्ती पर्शुराम केळकर यांनी काढले. समर्थ रंगभूमी रत्नागिरीतर्फे शहरातील साईमंगल सभागृहात रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून, गेली ४० वर्षे संगीत नाटकातून भूमिका करणारे ज्येष्ठ गायक रंगकर्मी पर्शुराम केळकर यांचा नटराजाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सत्कारमूर्ती ज्येष्ठ गायक, नट पर्शुराम केळकर यांनी नटराज पूजन केले. सत्कार सोहळ्यानंतर केळकर यांनी सप्तसूर झंकारित बोले गिरीजेची विणा ही नांदी सादर केली, त्यानंतर त्यांनी जयगंगे भागीरथी, युवतीमना दारुण रण, जय जय रमा रमण श्रीरंग अशी अतिशय गाजलेली नाट्यगीते केळकर यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या रंगलेल्या मैफिलीत त्यांना ओजस करकरे यांनी हार्मोनियमची तर संकेत पाडळकर यांनी तबल्याची साथ केली. पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा थोडक्यात आढावा घेऊन पुढच्या उपक्रमांबाबत माहिती दिली तर सचीव प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विजय साळवी लिखीत ''सम्राट'' या रहस्यमय एकांकिकेचे सुशिल जाधव आणि नुपूर पास्ते यांनी अतिशय सुंदर वाचन करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यावेळी राजन कोतवडेकर, राजेश मयेकर, रवींद्र इनामदार यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुंदर निवेदन सुशिल जाधव यांनी केले