जयदीप खोडकेचा कसालमध्ये सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयदीप खोडकेचा कसालमध्ये सत्कार
जयदीप खोडकेचा कसालमध्ये सत्कार

जयदीप खोडकेचा कसालमध्ये सत्कार

sakal_logo
By

60767
सिंधुदुर्ग ः जयदीप खोडके याचा सत्कार करताना जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.

जयदीप खोडकेचा कसालमध्ये सत्कार

शिक्षकेतर संघटनेचा पुढाकार; बुडणाऱ्या मुलाला जीवदान दिल्याची दखल

सावंतवाडी, ता. ६ ः विहिरीत बुडणाऱ्या मुलाला जीवदान देणाऱ्या मालवण येथील जयदीप खोडके याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे कसाल येथे सत्कार करण्यात आला.
मालवण रेवतळे येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या ग्रुपमधील १४ वर्षीय मुलगा चेंडू पकडण्याच्या नादात विहिरीत पडला. तिथेच क्रिकेट खेळणारा नववीचा विद्यार्थी जयदीप खोडके याच्या निदर्शनास येताच त्याने कुठलाही विचार न करता विहिरीमध्ये उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. त्याच्या शौर्याची ही बातमी जिल्हाभर पसरल्यानंतर जयदीपचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल कसाल येथे काल झाली. या सभेमध्ये खोडके याचा संघटनेतर्फे गौरव करण्यात आला. त्याच्या आई-वडिलांनाही शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकीकरणाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जानेवारीमध्ये सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, उपाध्यक्ष धनश्री गावडे, उपाध्यक्ष सुहास देसाई, आपा ठाकूर, बी. बी. चव्हाण, पांडुरंग दळवी, शाबी तुळसकर, विजय गवस, लाडू जाधव, नीलेश पारकर, शरद कांबळे, रुपेश खोबरेकर, गोपाळ हरमलकर, शर्मिला गावकर, गजानन मांजरेकर, विलास नाईक, गोविंद कानसे, दिलीप देवगडकर, सुधाकर बांदेकर, एस. के. सावंत, बाबी लोंढे, विनायक पाटकर, राजेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.