लोटेतील उद्योजकांचे प्रश्न आठ दिवसात सोडवू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेतील उद्योजकांचे प्रश्न आठ दिवसात सोडवू
लोटेतील उद्योजकांचे प्रश्न आठ दिवसात सोडवू

लोटेतील उद्योजकांचे प्रश्न आठ दिवसात सोडवू

sakal_logo
By

rat6p50.jpg
60774
लोटेः येथे उद्योजकांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत.
..................................
लोटे उद्योजकांचे प्रश्न आठ दिवसात सोडवू
उद्योगमंत्री सामंत , मोठे उद्योग, कंपन्या येथे आल्या पाहिजेत
चिपळूण, ता. ६ : लोटे औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न पुढील आठ दिवसात सोडविले जातील. त्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी आणि उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आठ दिवसात मुंबईत घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोटे येथे दिली.
पालकमंत्री सामंत रविवारी लोटे (ता. खेड) दौऱ्यावर होते. येथील उद्योजक संघटनेतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. उद्योग भवन येथे सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पाणी आणि इतर प्रश्न आहेत. उद्योजकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मला दिले आहे. उद्योजकांना नियमित आणि पुरेसा पाणी मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मी उद्योजकांना त्यांचे प्रश्न घेऊन मुंबईत बोलविले आहे. उद्योजकांच्या प्रश्नांवर कसा मार्ग काढता येईल याबाबत उपाययोजना सुचविण्याची सूचना मी अधिकाऱ्यांना केली आहे. मुंबईच्या बैठकीत लोटेतील सर्वच प्रश्नांवर चर्चा होईल. पुढील आठ दिवसात सर्वच प्रश्न मार्गी लावले जातील.
लोटे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी येथील कंपन्यानी उपायोजना सुरू केल्या आहेत अशी माहिती मला उद्योजक संघटनेकडून देण्यात आली ही समाधानाची बाब आहे. लोटे एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्या पाहिजेत. मोठे उद्योग आले पाहिजेत. कंपन्या आल्या तरच स्थानिकांचा फायदा होईल. तरुणांना रोजगार मिळेल यापूर्वी काही कंपन्या महाराष्ट्रातून निघून गेल्या त्याचे खापर आमच्या सरकारवर फोडले जात आहे पण त्यात तथ्य नाही हे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. येथे प्रदूषणाचा फार मोठा प्रश्न आहे. प्रदुषण रोखण्यासाठी येथे काही उपायोजना करण्यात आल्या. काही यंत्रणा बसवण्यात आली. ती यंत्रणा खऱी आहे का तिचा दर्जाही तपासला पाहिजे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय लोटे मध्ये असायला हवे ही उद्योजकांची मागणी आहे. आठ ते दिवसात त्यावर तोडगा काढला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक संघटनेचे प्रशांत पटवर्धन, राज आंब्रे आदी उपस्थित होते.

चौकट
ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जाची मागणी
लोटे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे. मी या मागणीला तत्त्वता मान्यता दिली आहे. रूग्णालयाचे आधुनिकीकरण केले जाईल. सर्व सुविधा येथे उपलब्ध केल्या जातील. या रुग्णालयात दहा खाटांचा वेगळा आणि आधुनिक कक्ष तयार केल्या जाईल त्याचा फायदा स्थानिकांना आणि कारखानदारांना होईल, असे सामंत यांनी सांगितले.