दारूवाहतुकीविरोधात लवकरच ‘ॲक्शन प्लान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूवाहतुकीविरोधात लवकरच ‘ॲक्शन प्लान’
दारूवाहतुकीविरोधात लवकरच ‘ॲक्शन प्लान’

दारूवाहतुकीविरोधात लवकरच ‘ॲक्शन प्लान’

sakal_logo
By

60780
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधिक्षक सौरवकुमार अगरवाल यांचे स्वागत करताना फुलचंद मेंगडे. शेजारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके. (छायाचित्र ः निखिल माळकर)


दारूवाहतुकीविरोधात लवकरच ‘ॲक्शन प्लान’

पोलिस अधिक्षक; सावंतवाडी पोलिस ठाण्याचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक सौरवकुमार अगरवाल यांनी आज सायंकाळी उशिरा येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्याचा आढावा घेत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चोरट्या दारूवाहतुकीला रोखण्यासाठी लवकरच ॲक्शन प्लान तयार केला जाणार आहे, अशी माहिती नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक अगरवाल यांनी दिली.
येथील विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोलिस अधीक्षक अगरवाल सायंकाळी सावंतवाडीत आले होते. त्यानंतर त्यांनी अचानक येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी येथील पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अधीक्षक अगरवाल यांचे स्वागत केले. त्यांनी पोलिस ठाण्याच्या अधिकारी वं कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले. जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावेल, असे काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी पोलिस ठाण्याची ही पाहणी करीत माहिती घेतली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील अवैध धंद्यांप्रश्नी माहिती घेण्याचे काम सुरु आहे. लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल, असे ते म्हणाले. आंबोली पोलिस दूरक्षेत्र अतिदुर्गम भागात आहे. त्या ठिकाणी पोलिसांना आवश्यक त्या सोई-सुविधा देण्याबाबत भेट देऊन माहिती घेतली जाईल, असे ते म्हणाले. येथील पोलिस ठाण्याच्या रिक्त पदाचा प्रश्न पोलिस भरतीमुळे सुटणार आहे, असे ते म्हणाले. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चोरट्या दारूवाहतुकीला रोखण्यासाठी लवकरच ॲक्शन प्लान तयार केला जाणार आहे, अशी माहिती नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक अगरवाल यांनी दिली.