नगर प्रदक्षिणेत हिंदू- मुस्लिमांच्या दोन देवतांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर प्रदक्षिणेत हिंदू- मुस्लिमांच्या दोन देवतांची भेट
नगर प्रदक्षिणेत हिंदू- मुस्लिमांच्या दोन देवतांची भेट

नगर प्रदक्षिणेत हिंदू- मुस्लिमांच्या दोन देवतांची भेट

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat७p६.jpg-
६०८२८

रत्नागिरी : विठुरायाच्या नगर प्रदक्षिणेवेळी धनजीनाका येथे रथ आला असता मुस्लिम बांधवांनी विठुरायाचा दर्शन घेतले आणि विठ्ठल मंदिरातर्फे दर्ग्याला नारळ, पेढे ठेवण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधव.

नगर प्रदक्षिणेत हिंदू- मुस्लिमांच्या देवतांची भेट

रत्नागिरी, ता. ७ ः शहरातील विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशीपासून उत्सवाला सुरवात झाली. वैकुंठ चतुर्दशीला देव विठोबा रथातून रत्नागिरी नगराची प्रदक्षिणा केली. त्या वेळी मोठ्या भक्तीभावाने उत्साहाने सर्व भक्तगण या रथयात्रेत सहभागी झाले. विठोबाचा रथ धनजीनाका येथे आल्यावर नाक्यावरील दर्ग्यामध्ये हिंदू-बांधवांनी जाऊन नमस्कार केला आणि विठ्ठल मंदिर देवस्थानकडून प्रथेप्रमाणे नारळ-पेढे ठेवले. दर्गा कमिटीकडून विठोबाला रथामध्ये श्रीफळ-पेढे देण्यात आले.
हिंदू-मुस्लिम समाजाचे हे ऐक्याचे प्रतीक असून अनेक वर्षांची परंपरा असल्याचे विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी सांगितले. त्यानंतर दर्ग्याजवळच कापूर आरती केली. भक्तमंडळींनी लोटांगण घातले. या दोन देवतांची भेट झाल्यावर हा रथ नगर प्रदक्षिणा करायला पुढे निघाला. संपूर्ण शहराला प्रदक्षिणा करून हा रथ मग बारा वाड्यांचे ग्रामदैवत भैरी मंदिरात नेण्यात आला. तेथे हरिहरेश्वराची भेट झाल्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आली.