गांधीनगर ग्रामपंचायत भाजपकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर ग्रामपंचायत भाजपकडे
गांधीनगर ग्रामपंचायत भाजपकडे

गांधीनगर ग्रामपंचायत भाजपकडे

sakal_logo
By

60844
कणकवली : येथील ओम गणेश निवासस्थानी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत करताना आमदार नीतेश राणे.


गांधीनगर ग्रामपंचायत भाजपकडे

सरपंचांसह तिघांचा प्रवेश; आमदार नीतेश राणेंकडून स्वागत

कणकवली ता.७ : गांधीनगर (भिरवंडे, ता.कणकवली) येथील सरपंच मंगेश अनंत बोभाटे यांच्यासह आणखी तीन सदस्य सुनीता अनाजी सावंत, मंजुषा महादेव बोभाटे, आणि प्रसन्ना प्रशांत सावंत तसेच शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, समीर प्रभूगावकर, श्यामसुंदर दळवी, संदीप सावंत, आनंद घाडी, सुभाष मलंडकर, रमेश सावंत, विजय सावंत, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
सरपंचांसह आणखी तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत गावात कोणतेही विकासकाम न झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे नेतृत्वावर विश्वास ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सरपंच मंगेश बोभाटे यांनी सांगितले.