भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबुळी’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबुळी’ प्रथम
भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबुळी’ प्रथम

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबुळी’ प्रथम

sakal_logo
By

60853
नेतर्डे ः भजन स्पर्धेतील विजेत्या संघासोबत प्रमोद कामत आदी.

भजन स्पर्धेत ‘स्वरधारा तांबुळी’ प्रथम

नेतर्डेतील आयोजन; ‘मणेरी स्वराभिषेक’ द्वितीय, ‘कलंबिस्त’ तृतीय

बांदा, ता. ७ ः नेतर्डे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित खुल्या भजन स्पर्धेत तांबुळीच्या स्वरधारा भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. मणेरीचे स्वराभिषेक मंडळ द्वितीय, तर कलंबिस्तच्या श्री स्वामी समर्थ मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले.
नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री देव राष्ट्रोळी कला, क्रीडा मंडळाच्यावतीने खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, उपसरपंच प्रशांत कामत, तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, अनंत गवस, देविदास गवस, पुंडलिक नाईक, रामदास नाईक, देवेंद्र गवस आदी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकांत अनुक्रमे उत्तेजनार्थ-श्री माऊली भजन मंडळ (कोलझर), उत्कृष्ट गायक-गीतेश कांबळी (मणेरी), गौळण गायक-कपिल गांवस (अमई गोवा), झांज-नरेश गवस (नेतर्डे), हार्मोनियम-अमोल गांवस (केरी गोवा), तबला-विराज गांवस (केरी), पखवाज-मेहल कांडरकर (तांबुळी), शिस्तबद्ध संघ-चांदेल भजन मंडळ, कोरस-समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव, लक्षवेधी संघ-सातपाटेकर महिला भजन मंडळ, उत्कृष्ट श्रोता-परशुराम गांवस यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड, गुरुदास गावकर यांनी केले.
बक्षीस वितरम प्रसंगी माजी सभापती प्रमोद कामत, जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, उपसरपंच प्रशांत कामत, तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, रवींद्र गवस, देविदास गवस, अनंत गवस, पुंडलिक नाईक, रामदास नाईक, सखाराम गवस, सत्यनारायण गवस, लक्ष्मण गवस, विजय गवस, कृष्णा गवस, अशोक गवस, पोलिसपाटील निळकंठ गवस, आदित्य गवस आदी उपस्थित होते. विलास गवस यांनी सूत्रसंचालन केले. विवेक गवस यांनी आभार मानले.