कोल्हापूर खंडपीठाबाबत लवकरच योग्य तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर खंडपीठाबाबत
लवकरच योग्य तोडगा
कोल्हापूर खंडपीठाबाबत लवकरच योग्य तोडगा

कोल्हापूर खंडपीठाबाबत लवकरच योग्य तोडगा

sakal_logo
By

60852
सावंतवाडी ः विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची अॅड. परिमल नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भेट.

कोल्हापूर खंडपीठाबाबत
लवकरच योग्य तोडगा

अॅड. नार्वेकर ः वकिलांच्या प्रश्नांबाबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः गेली अनेक वर्ष कोल्हापूर खंडपीठ हा ज्वलंत विषय आहे. सिंधुदुर्गातील न्यायीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी विविध प्रश्न भेडसावत असतात. त्यावर योग्य तोडगा लवकरात लवकर काढण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
येथील सरस्वती निवासस्थानी खाजगी दौऱ्यानिमित्त आलेल्या अॅड. नार्वेकर यांच्यासोबत माजी सभापती अॅङ. परिमल नाईक यांनी भेट घेत सिंधुदुर्गातील न्यायीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी भेडसावणार्‍या विविध प्रश्नांबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती उदय नाईक, सुधीर आडीवरेकर, संतोष गवस, अमीत गवंडळकर, बाळा बोर्डेकर, रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासाच्यादुष्टीनेही चर्चा केली. सावंतवाडी मोती तलाव संवर्धन, मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल, शहरातील नियोजीत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, भुमीगत विजवाहीनी योजना, पर्यटन या विषयावर यावेळ सखोल चर्चा केली. याबाबत नार्वेकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत निश्चितच सहकार्य करू, असे आश्वासन दिले.