राजापूर-फळपिकांवरील कीड रोगांच्या सर्व्हेक्षणासाठी हॉर्टसॅप प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-फळपिकांवरील कीड रोगांच्या सर्व्हेक्षणासाठी हॉर्टसॅप प्रकल्प
राजापूर-फळपिकांवरील कीड रोगांच्या सर्व्हेक्षणासाठी हॉर्टसॅप प्रकल्प

राजापूर-फळपिकांवरील कीड रोगांच्या सर्व्हेक्षणासाठी हॉर्टसॅप प्रकल्प

sakal_logo
By

rat७p२.jpg

राजापूर ः आंबा कलमांवर डोकावत असलेला मोहोर.
-rat७p३.jpg ः
६०८२५
आंबा कलमाला आलेली पालवी.
------------
फळपिकांवरील कीड रोगांच्या सर्व्हेक्षणासाठी हॉर्टसॅप प्रकल्प
राजापुरातील ७७ ठिकाणांची निवड : प्रादुर्भावाची नेमकी स्थिती होणार स्पष्ट
राजापूर, ता. ७ ः अवकाळी पाऊस, बदलते प्रतिकूल वातावरण तर कधी किडीचा प्रादुर्भाव आदी विविध कारणांमुळे कोकणचा राजासह (हापूस आंबा) काजू पीक आर्थिकदृष्ट्या गेल्या काही वर्षामध्ये धोक्यात आले आहे. त्यामध्ये गतवर्षीपासून फळमाशीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या नुकसानीची भर पडली आहे. बागायतदार चिंताक्रांत असताना आंबा व काजू पिकाला नुकसानीच्या खाईत लोटणाऱ्या विविध कीड व रोगांचे सर्व्हेक्षण करून त्यावर मात कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना सल्ला देणारा शासनातर्फे ‘हॉर्टसॅप’ प्रकल्प राबवला जात आहे.
या प्रकल्पाची तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी केली जात असून त्यासाठी तालुका कृषी विभागातर्फे सुमारे ७७ ठिकाणांची निवड केली आहे. या ठिकाणांची निवड करताना ज्या भागामध्ये वा सजेमध्ये काजू फळपिकाचे क्षेत्र जास्त त्या भागामध्ये काजू पिकासाठी तर ज्या भाग वा सजेमध्ये आंबा फळपिकाचे क्षेत्र जास्त त्या भागामध्ये आंबा पिकासाठी प्लॉटची निवड करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. निवड केलेल्या प्लॉटमध्ये आंबा पिकाची ३५, तर काजू पिकाच्या ४२ ठिकाणांचा समावेश आहे. या प्रकल्पातील सर्व्हेक्षणातून आंबा आणि काजूवरील विविध प्रादुर्भावाची स्थिती आणि प्रमाण किती आहे याचा अभ्यास होऊन त्याचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना त्यावर उपाययोजना करून संभाव्य आर्थिक तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.
हॉर्टसॅप प्रकल्पासाठी निवड केलेल्या गावातील निश्‍चित केलेल्या प्लॉटमध्ये संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी सर्वेक्षण करून पिकांची अवस्था व कीड रोगाची निरीक्षणे करून अहवाल नोंदवणार आहेत. या नोंदीची योजनेच्या संकेतस्थळावरही माहिती अपलोड केली जाणार आहे. जर कीड, रोग आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषी विद्यापीठामार्फत त्यावर मार्गदर्शक सूचना पाठवण्यात येतात. त्यानुसार संबंधित बागेसह परिसरातील कीड व रोगाचे नियंत्रणाचे उपाय केले जाणार आहेत.
----------------------
चौकट
कोणत्या कीड वा रोगांचे होणार सर्व्हेक्षण
आंबापिकाचे सर्व्हेक्षण करताना तुडतुडे व फुलकिडे, फळमाशी, भुरी वा करपा रोग या अनुषंगाने तर काजू पिकाचे सर्व्हेक्षण करताना ढेकण्या, फुलकिडे, खोडकिडा यांसह अन्य रोग यांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करून नोंदी ठेवायच्या आहेत.
---------
चौकट
सर्व्हेक्षणासाठी निवडलेली राजापूरची गावे
*आंबा पीकः नाटे, भराडीन, जानशी, अणसुरे, शिवणे खुर्द, देवाचेगोठणे, आंबेलकरवाडी, धाऊलवल्ली, मिठगवाणे, दळे, नवेदर, वरचीवाडी, धोपेश्‍वर, दोनिवडे, कोंड्येतर्फ सौंदळ, गोठणेदोनिवडे,
*काजू पीकः घुमेवाडी, खडकवली, खालचा भंडारवाडा, भालावली वरची गुरववाडी, मूर, सावडाव, चिखलेवाडी, तळवडे, कोळवणखडी, मांजरेवाडी, ओझर, कारवली, करक, पांगरीखुर्द, काजिर्डा, कोळंब, धोपेश्‍वर, हसोळतर्फ सौंदळ, जुवाठी, नेरकेवाडी.