संत गोरा कुंभार विकास मंडळातर्फे रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत गोरा कुंभार विकास मंडळातर्फे रक्तदान शिबिर
संत गोरा कुंभार विकास मंडळातर्फे रक्तदान शिबिर

संत गोरा कुंभार विकास मंडळातर्फे रक्तदान शिबिर

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)
(जाहिरातदार आहेत)

शिबिरात ७० जणांनी केले रक्तदान

संत गोरा कुंभार विकास मंडळ ; युवा आघाडीचा पुढाकार

चिपळूण, ता. ७ ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ व युवा आघाडी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने खेर्डी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी कुंभार समाजाच्या युवा आघाडीने मोठा पुढाकार घेतला. त्यामुळे या शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील ७० हून अधिक समाजबांधवांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या मंडळाच्या सभागृहात डेरवण रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या मंडळाच्यावतीने कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध विधायक उपक्रम राबवले जातात. समाजबांधवांच्या अडीअडचणीच्या काळात मंडळाचे पदाधिकारी धावून मदत करतात. दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी रक्ताची गरज भासते. वेळेत रक्त मिळाल्याने अनेकांचे जीव वाचले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान ठरले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून कुंभार समाजाच्या युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिराचे आयोजन केले. त्याला शहरासह ग्रामीण भागातून चांगला प्रतिसादही मिळाला. शिबिरकर्त्यांची डेरवण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच युवा आघाडीच्या तरुणांनी योग्य व्यवस्था केली होती. प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रक्तदान घेण्यात आले. कुंभार समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष महेश सायकर, डॉ. पी. व्ही. कुंभार, शशिकांत पाभरेकर यांनी शिबिराला हजेरी लावत मंडळाच्या कामाचे कौतुक केले. कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी, प्रकाश निवळकर, रवी साळवी, जनार्दन मालवणकर, अण्णा गुडेकर, सुनील टेरवकर, महेश पडवेकर, दिनेश गुडेकर, प्रदीप शिरकर, रवींद्र शिरकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.