जुना कालभैरव देवस्थानतर्फे कालभैरव जयंती महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना कालभैरव देवस्थानतर्फे कालभैरव जयंती महोत्सव
जुना कालभैरव देवस्थानतर्फे कालभैरव जयंती महोत्सव

जुना कालभैरव देवस्थानतर्फे कालभैरव जयंती महोत्सव

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-ratchl७४.jpg

श्री जुना कालभैरव


चिपळुणात कालभैरव जयंती महोत्सव

जुना कालभैरव देवस्थान ; ९ ते १७ नोव्हेंबरपर्यंत कार्यक्रम, १६ ला पालखी मिरवणूक

चिपळूण, ता. ७ ः चिपळूणचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्यावतीने ९ ते १७ नोव्हेंबरदरम्यान श्री कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ९ ते १७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी श्रींची नित्यनियमित पूजाअर्चा, रात्री ७.३० वा. कर्पूर आरती नंतर श्री कालभैरव ध्यानं, स्त्रोत्र, अष्टक, कवचपठण इत्यादी धार्मिक विधी होतील. ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ, १० ला सायंकाळी ५ ते ७ श्री देवी कालिकामाता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप), ११ ला श्री जिव्हेश्वर महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप), १२ ला श्री विठ्ठल रूक्मिणी प्रासादिक संगीत भजन मंडळ (मालघर), १३ ला वामनराव साडविलकर संस्थापित ''स्वरदर्शन कलाकुंज'' प्रस्तुत ''स्वरबाल्य'' ( बालदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त) विशेष सांगीतिक कार्यक्रम, १४ ला श्री हनुमान प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पाग), १५ ला श्री श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (वैश्य वसाहत), १६ ला श्री कालभैरव जयंती (कालाष्टमी) सकाळी १०.३० ते १ जन्मकाल कीर्तन शरदबुवा तांबे (चिपळूण) यांचे होईल. दुपारी १ ते ४ वा. श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरापासून ब्राह्मणआऴी, राऊतआळी, शेट्येआळी, श्रीराम चौक, वैश्यवसाहतमधून मुरादपूरकडे साळीवाडी, कुंभारवाडीकडून श्री क्षेत्र गांधारेश्वर भेट घेऊन तळ्यातील श्री गणेश मंदिराकडून बेंदरकरआळी, ब्राह्मणआळीतून श्रींच्या मंदिरात येईल. सायंकाळी ५ ते ७ वा. (कै.) वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली यांचा कार्यक्रम होईल.
गुरुवारी (ता. १७) ला लळित कार्यक्रम दुपारी ११ ते २ महाप्रसाद वाटप, सायंकाळी ५ ते ७ श्री सिद्धी प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पाग) चिपळूण , सायं. ७ ते ७.३० वा. श्री वेस मारूतीभेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरापासून लोटिस्मा वाचनमंदिरमार्गे श्री वेस मारूती भेट घेऊन अनंत आईस फॅक्टरीकडून श्री गौतमेश्वर नगरातून श्रींच्या मंदिरात येईल. रात्री ९ ते १२.३० पर्यंत लळिताचे कीर्तन शरदबुवा तांबे यांचे होईल. ग्रामदेवतेच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमामध्ये भक्तगण व नागरिकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त किशोर शेट्ये, समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, चंद्रशेखर लाड आणि जन्मोत्सव समिती अध्यक्ष दिनेश देवळेकर यांनी केले आहे.