कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा
कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा

कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा

sakal_logo
By

कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा

सुधा कवठणकर ः पालकमंत्री चव्हाणांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः कवठणी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती झाडी तत्काळ तोडावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे झाडी न तोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कवठणी मुख्य रस्त्यावरील झाडी तोडण्यासाठी बांधकाम उपविभागीय अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी केली होती. कवठणी मुख्य रस्ता वळणावळणाचा तसेच अरुंद आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. बांधकामकडून रस्त्यावरील झाडी तोडण्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. उर्वरित काम केव्हा करणार, अशी विचारणा केली असता मक्तेदार व अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. उर्वरित काम दिवाळीनंतर करू, अशी उत्तरे मक्तेदार, अधिकाऱ्यांकडून मिळतात. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी. रस्त्यावर जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील, असाही इशारा कवठणकर यांनी दिला आहे.