आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मॅंगो पार्सल व्हॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मॅंगो पार्सल व्हॅन
आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मॅंगो पार्सल व्हॅन

आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मॅंगो पार्सल व्हॅन

sakal_logo
By

(पान २ साठीमेन)

आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मॅंगो पार्सल व्हॅन सोडा

कोकण रेल्वेसोबत आमदार निकमांची चर्चा ; कोकण रेल्वेला स्वतंत्र निधी मिळावा

चिपळूण, ता. ७ ः कोकण रेल्वेला स्वतंत्र निधी मिळावा, रत्नागिरी-पनवेल मार्गावर प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात याव्यात. चिपळूण, सावर्डे, कडवई आणि संगमेश्वर या स्थानकात काही गाड्या थांबवून तेथील समस्याही मार्गी लागल्या पाहिजेत. शिमगा, गणेशोत्सव अशा सणांवेळी जादा गाड्यांची संख्या वाढवावी. आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मँगो पार्सल व्हॅन दिल्ली एर्नाकुलम या मार्गावर सोडण्यात यावी आदी विविध मागण्या आमदार शेखर निकम यांनी कोकण रेल्वेच्या बैठकीत मांडल्या. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून कार्यवाहीचे ठोस आश्वासन दिले.
जम्मू-कश्मीर येथील चिनाब पुलाची पाहणी आणि कोरे सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, गोवा खासदार विनय तेंडुलकर, इराना कडाडी, आमदार मधुसूदन तसेच कोरेचे संजय गुप्ता, आशिष पेडेकर, विजय केनेवडेकर, चंद्रकांत गवस, सचिन वहाळकर, संतोषकुमार झा, नंदू तेलग आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार निकम यांच्यासह खासदार राऊत व सचिन वहाळकर यांनी जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. चिपळूण-सावर्डे, कडवई आणि संगमेश्वर येथील प्रश्न मांडताना जिल्ह्यातील प्रवाशीवर्गाचे होणारे हाल आणि अनेक वर्षे न सुटलेले प्रश्न मांडून त्या संदर्भात ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली.
रत्नागिरी ते पनवेल मार्गावर जादा गाड्या सोडाव्यात. पूर्वीच्या गाड्यांना पर्यायी क्लोन ट्रेन किंवा डुप्लिकेट ट्रेन चालवण्याचे प्रस्तावित होते तसेच तुतारी व जनशताब्दी या गाड्यांच्या बाबतीत करावे. पश्चिम रेल्वेवरून रत्नागिरी व सावंतवाडीकरिता नियमित गाडी सुरू करावी. शिमगा, गणेशोत्सव व सुट्ट्यांच्यावेळी जादा गाड्यांची संख्या वाढण्याची मागणी निकम यांनी केली
दिवा-सावंतवाडीला स्वतंत्र आरक्षण डबा होता; मात्र कोरोना काळात बंद झाला असून पुन्हा सुरू करावा. चिपळूण ते दादर गाडी सुरू करावी. पश्चिमेकडे तिकीटघर सुरू करावे. स्थानकाच्या दोन्ही बाजूला रिक्षाथांबे सुरू करावेत. संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा व हॉलिडे स्पेशल गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी गेली तीन वर्षे केली जात आहे. कडवई स्थानकाजवळ तुरळ, गोळवली, शिंदे आंबेरी मावळंगे अशी किमान ५० गावे आहेत. सावंतवाडी दिवा गाडीला थांबा द्यावा आणि रिक्षास्टॅण्डसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
हापूस आंबा वाहतुकीसाठी स्पेशल मँगो पार्सल व्हॅन दिल्ली व एर्नाकुलम या दोन्ही मार्गावर सोडण्यात यावी त्याचबरोबर दररोज पुणे मार्गावर गाडी सोडण्यात यावी. ज्यांच्या कोकण रेल्वेसाठी जमिनी गेल्या आहेत त्या कुटुंबात अनेकजण बेरोजगार आहेत. अनेकांना नोकरी मिळाली असली तरी अनेकजण प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी भरतीत या प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीही निकम यांनी केली.


सावर्डेत ओव्हरब्रिज, अंडरपास दिल्यास फायदा

सावर्डे येथे सह्याद्री शिक्षणसंस्थेत राज्यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. जवळच वालावलकर रुग्णालय, डेरवण पर्यटनस्थळ आहे, मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी एकाच बाजूला प्लॅटफॉर्म असल्याने क्रॉसिंगवेळी दुसऱ्या बाजूला उतरावे लागत असून ओव्हरब्रिज किंवा अंडरपास नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. हॉलिडे स्पेशल गाड्या व मत्स्यगंधा यांना येथे थांबा द्यावा. कळंबस्ते उड्डाणपूल महत्वाचा आहे. येथे मोठी रहदारी असून महामार्गाला पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे उड्डाणपूल अत्यावश्यक असून रेल्वेस्थानक ते चिपळूण बाजारपेठ जोडणारा भुयारी मार्ग करण्याची मागणी केली.