कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी
कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी
कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी

कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी कुडाळवासीयांच्या हरकतींवर १५ला सुनावणी

sakal_logo
By

टीपः swt७२८.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः येथील नगरपंचायत कार्यालयात नकाशा तयार करणारी कंपनी आणि नगरसेवकांची झालेली बैठक.


हरकतींवर होणार १५ला सुनावणी

कुडाळ नगरपंचायत; अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशाबाबत बैठक

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः येथील नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशावर हरकती आल्यानंतर त्या संदर्भात नगरपंचायतीच्या नगरसेवकांची बैठक आज झाली. या बैठकीत त्यांच्या हरकती काय आहेत, हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सुनावणीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले असून ही सुनावणी १५ ला येथील महालक्ष्मी हॉलमध्ये घेण्याचे ठरले.
येथील नगरपंचायतीने अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशा तयार करण्यासाठी नगर रचनाकार यांच्या माध्यमातून कंपनी नेमली होती. या कंपनीने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला. हा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील ५३७ नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींबाबत कोणत्या प्रकारे निर्णय घेतला जावा तसेच या नकाशा बाबतची माहिती नगरसेवकांना व्हावी, यासाठी नकाशा तयार करणारी कंपनी आणि नगरसेवकांची बैठक आज नगरपंचायत कार्यालयात झाली. यावेळी नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेविका संध्या तेरसे, भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती दळवी, श्रुती वर्दम, अक्षता खटावकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, संतोष शिरसाट उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना अस्तित्वातील वापर नकाशा या संदर्भात प्रश्न-उत्तर करण्यात आले. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘हा नकाशा अंतिम नाही. याबाबत सुनावणी होणार आहे. जशा सूचना येतील, तशा दुरुस्ती केल्या जातील.’
--
कोणावरही अन्याय नको
नगरसेवकांनी सांगितले की, ‘‘याबाबत ज्या नागरिकांच्या हरकती आहेत, त्यांच्यासमवेत सुनावणी घ्या आणि त्यानुसार दुरुस्त्या करा. कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्या.’’ त्यानंतर १५ तारीखला येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सुनावणी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले.