चिपळुणातील महिलेचा खून द्वेष, रागातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील महिलेचा खून द्वेष, रागातून
चिपळुणातील महिलेचा खून द्वेष, रागातून

चिपळुणातील महिलेचा खून द्वेष, रागातून

sakal_logo
By

( पान ३ )

चिपळुणातील महिलेचा खून द्वेष, रागातून

साथीदार सामील ; टोमण्यातून विषय खुनापर्यंत

चिपळूण, ता. ७ ः पेठमाप येथील कुलसुम अन्सारी या महिलेचा खून हा द्वेष आणि रागातून झाल्याचे समोर येऊ लागले आहे; परंतु अटकेत असलेल्या संशयितांने एकट्यानेच हा खून केला की, त्याचे अन्य साथीदारही सामील आहेत याचाही देखील पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, मंगळवारी पुन्हा एकदा संशयिताला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
शहरातील पेठमाप येथे कुलसुम अन्सारी या महिलेचा मृतदेह ३१ ऑक्टोबरला आढळून आला होता. अर्धवट जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आल्याने ही आत्महत्या नसून खून असल्याचा अंदाज लावत पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासाच्या दृष्टीने अत्यंत किचकट बनलेल्या व पोलिसांसमोर आव्हान ठरलेल्या या प्रकरणाचा अवघ्या ५ दिवसात चिपळूण पोलिसांनी छडा लावला आणि या प्रकरणात मुख्य संशयिताला पेठमाप येथील एका तरुणाला अटक केली.
संशयित म्हणून एकाला अटक केली असली तरी एका कष्टकरी महिलेचा खून करण्यामागे नेमका उद्देश तरी काय, या प्रश्नाचे उत्तर अद्याप पुढे आलेले नाही; परंतु मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, द्वेष आणि रागातून रोजच्या टोमण्यातून हा खुनापर्यंत विषय पोहचला असल्याची माहिती तपासात पुढे येऊ लागली आहे. आता एकट्यानेच हा खून केला का की अन्य त्याचे कोण साथीदार होते, याचा पोलिस तपास करत आहेत.