रस्ता खचून ट्रक अडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता खचून ट्रक अडकला
रस्ता खचून ट्रक अडकला

रस्ता खचून ट्रक अडकला

sakal_logo
By

रस्ता खचून ट्रक अडकला
मानखुर्द ः मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीत रस्ता खचल्यामुळे शिधावाटप विभागाचा ट्रक सोमवारी (ता. ७) सकाळी अडकला होता. त्या ठिकाणी नुकतेच पालिकेकडून मलनिस्‍सारण वाहिनीचे काम करण्यात आले होते. पालिकेचे संबंधित अभियंता अक्षय कराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले. मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीलगत असलेल्या म्हाडा वसाहतीतील मुख्य रस्त्यावरून शिधावाटप विभागाचा अवजड वाहतूक करणारा ट्रक सोमवारी सकाळी जात होता. याच रस्त्याच्या खालून मलनिस्‍सारण वाहिनी गेली आहे. त्या वाहिनीचे काम पालिकेकडून नुकतेच करण्यात आले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेला खड्डा बुजवण्यात आला होता. त्या खड्ड्याच्या ठिकाणी हा अवजड वाहतूक करणारा ट्रक आला असता रस्ता खचला व त्यामुळे ट्रक अडकल्याचे स्थानिकांनी सांगितले. पालिकेने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप स्थानिकांनी या घटनेनंतर केला आहे.