पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळे त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळे त्रास
पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळे त्रास

पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळे त्रास

sakal_logo
By

पदपथांवरील पेव्हर ब्लॉकमुळे त्रास
चेंबूर ः चेंबूर रेल्वेस्थानकाच्‍या जवळील एन.जी आचार्य मार्ग व अन्य पदपथांवर पालिका ठेकेदारातर्फे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र पेव्हर ब्लॉक वेळेत बसवण्यात येत नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. पालिका ठेकेदार मार्फत मुंबई उपनगरातील पदपथांवरील सर्व जुने पेव्हर ब्लॉक काढून नवीन बसवण्याचे काम सुरू आहे. याच पदपथांवर फेरीवाले आपले धंदे लावून पदपथ अडवीत आहेत. ठेकेदाराने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक काढून ढिगारे करून ठेवले आहेत. हे ढिगारे उचलून घेऊन जाण्यास दिरंगाई होत असल्याने प्रवाशांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. पालिकेचा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.