विशाल फाउंडेशनकडून सावंत कुटुंबीयांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशाल फाउंडेशनकडून
सावंत कुटुंबीयांना मदत
विशाल फाउंडेशनकडून सावंत कुटुंबीयांना मदत

विशाल फाउंडेशनकडून सावंत कुटुंबीयांना मदत

sakal_logo
By

60962
वेंगुर्ले ः महावितरण अधिकाऱ्यांकडे आर्थिक मदत सुपूर्द करताना विशाल सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी.

विशाल फाउंडेशनकडून
सावंत कुटुंबीयांना मदत
सावंतवाडी ः वेंगुर्ले तालुक्यातील महावितरणच्या रेडी विभागातील शाखा कार्यालयात वीज वाहिनीवर काम करत असताना तनय सावंत यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. युवा नेते व विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज सावंत कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत महावितरण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजप नेते अशोक सावंत, महिला मोर्चा भाजप जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन तेंडुलकर, माजी सभापती प्रीतेश राऊळ, नगरसेवक नीलेश परब, अजय आकेरकर, नंदू राणे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
............
60974
सावंतवाडी ः येथे घोषणाबाजी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

‘त्या’ विधानाचा राष्ट्रवादीतर्फे निषेध
सावंतवाडी ः राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. सत्तार यांनी केलेले वादग्रस्त विधान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रेवती राणे, युवती अध्यक्ष सावली पाटकर, शहराध्यक्ष सायली दुभाषी, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, शहराध्यक्ष देवा टेमकर, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, राकेश नेवगी, नगरसेविका अफरोज राजगुरू, निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, संदीप राणे, अॅड. संदेश राणे, आदी उपस्थित होते.