जामसंडे यात्रोत्सवात गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जामसंडे यात्रोत्सवात गर्दी
जामसंडे यात्रोत्सवात गर्दी

जामसंडे यात्रोत्सवात गर्दी

sakal_logo
By

60987
जामसंडे ः येथील यात्रेत दर्शन घेताना आमदार नीतेश राणे.

जामसंडे यात्रोत्सवात गर्दी
देवगड ः जामसंडे येथील श्री दिर्बादेवी व श्री देव रामेश्‍वर मंदिरात आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने यात्रा भरली होती. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग होती. मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. मंदिर परिसरात तसेच यात्रा मार्गात विविध प्रकारची दुकाने थाटली होती. यात्रेमुळे परिसरातील वर्दळीतही वाढ झाल्याचे चित्र होते. यात्रेनिमित्ताने सकाळपासून भाविक मंदिरात दर्शनासाठी येत होते. आमदार नीतेश राणे, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांनी दर्शन घेतले. दुपारनंतर गर्दीत आणखी वाढ झाल्याचे चित्र होते.