संशयातून तरुणाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशयातून तरुणाला मारहाण
संशयातून तरुणाला मारहाण

संशयातून तरुणाला मारहाण

sakal_logo
By

(पान ३ साठी)

फसवल्याच्या संशयातून तरुणाला मारहाण

रत्नागिरीत बॅंकेसमोर राडा ; दोघांची रवानगी ठाण्यात

रत्नागिरी, ता. ७ : एका तरुणीच्या नावे कर्ज काढून तिची फसवणूक करत असल्याचा समज करून घेऊन एका तरूणाला जमावाने चांगलेच चोपले. शहरातील आरोग्य मंदिर येथील एका बॅंकेसमोर आज (ता. ९) सायंकाळी हा प्रकार घडला. यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या चोप दिलेल्या तरुण व संबधित तरुणीला ताब्यात घेतले.
एका तरुणीला घेऊन एक तरुण एका बॅंकेत आला होता. तो मुलीची आर्थिक फसवणूक करणार असल्याच्या संशयावरून त्या तरुणीची मैत्रीण दोघांच्या मागावर आली. तिच्याबरोबर अन्य काही व्यक्ती होत्या. तरुणीला घेऊन तरुण बॅंकेत गेला तेव्हा मैत्रीण आणि तिचे सहकारी बॅंकेत आले. त्यांना पाहून पैसे न काढता तो बाहेर आला. आलेल्यांनी तरुणाला बॅंकेबाहेर अडवले. मुलीच्या नावे कर्ज काढून तिची फसवणूक करणार असल्याचा समज करून त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. काही क्षणात तेथे पोलिस आले. पोलिसांनी तरुण आणि तरुणीकडे विचारणा केली. तेव्हा येथे उपस्थित काहीजण म्हणत होत्या की हा तरूण त्या मुलीची फसवणूक करीत आहे. मात्र तो तरुण संबधित तरूणी आपल्याकडे कर्मचारी आहे, असे सांगत होता. त्यावर तरुणीने गेले तीन ते चार महिने त्याने तिला पगार दिलेला नाही, असे सांगत होती. तरुणीच्या मैत्रीणीबरोबर आलेल्या व्यक्ती जोरजोरात वाद घालत होत्या.
पोलिसांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. तणाताणी वाढत चालल्याने दोघांना पोलिस ठाण्यात चला, असे सांगितले. मात्र तरुण पोलिस ठाण्यात जाण्यास तयार नव्हता. मी तिच्या नावावर कोणतेही कर्ज काढलेले नाही, असे सांगत होता. गर्दी वाढू लागल्याने पोलिस दोघांनाही घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तशी बघ्यांची गर्दी कमी झाली. परंतु सायंकाळी उशिरा याबाबतची तक्रार दाखल झाली नव्हती.