अडथळ्यांच्या फेऱ्यात अडकले साखरीआगर जेटीचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडथळ्यांच्या फेऱ्यात अडकले साखरीआगर जेटीचे काम
अडथळ्यांच्या फेऱ्यात अडकले साखरीआगर जेटीचे काम

अडथळ्यांच्या फेऱ्यात अडकले साखरीआगर जेटीचे काम

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-rat८p२.jpg ः
६१०३१

गुहागर ः साखरीआगर जेटीची काम रखडल्याने मच्छीमारांची अडचण होत आहे.


अडथळ्यांच्या फेऱ्यात अडकले साखरीआगर जेटीचे काम

११ वर्षानंतरही प्रतिक्षा कायम ; मच्छीमार सोसायटीचे उद्योगमंत्री सामंतांना साकडे

गुहागर, ता. ८ ः राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०११ मध्ये मंजूर झालेल्या आणि २०१२-१३ मध्ये काम सुरू करण्याचे आदेश दिलेल्या साखरीआगर जेटीचे काम मंजुरी मिळून ११ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. २०१५ मध्ये मत्स्य आयुक्तालयाने हे काम थांबवले. हे आरसीसी जेटीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे साकडे साखरीआगर हेदवी गट मच्छीमार सहकारी सोसायटीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना घातले आहे.
साखरीआगर येथे मच्छीमार जेटी बांधण्याचा प्रस्ताव आमदार भास्कर जाधव यांनी २०११ मध्ये केंद्र सरकारकडून मंजूर करून आणला होता. त्यावेळी साखरीआगर जेटीसाठी २ कोटी ९७ लाख रुपये खर्च होणार होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. अर्थसंकल्पात या कामाचा समावेश झाला. २०१२-१३ मध्ये पत्तन अभियंता यांनी निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कार्यारंभाचा आदेशही दिला. हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी २०१४ ला संपत होती. तरीही मार्च २०१५ पर्यंत हे काम सुरू होते. शासनाचा १६ लाख २५ हजाराचा निधी या कामावर खर्चही झाला; पण सीआरझेडची परवानगी नसल्याने हे काम थांबले.
या जेटीचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी साखरीआगरमधील मच्छीमारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करू, असा शब्द दिला. म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.
आता साखरीआगर जेटीच्या बांधकाम सुरू होण्यामध्ये कोणताच अडथळा नव्हता; परंतु त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्य घडले. सरकार बदलले. परिणामी साखरीआगर जेटीचे काम जैसे थे राहिले. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने या कामाला गती देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन मच्छीमार सोसायटीने राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.


गेल्यावर्षी ८ कोटी ४३ लाख रुपये मंजूर

आमदार भास्कर जाधव यांनी निवडून आल्यावर पाठपुरावा सुरू केला; मात्र शासकीय यंत्रणा दाद देत नव्हत्या. त्यामुळे संतापलेल्या आमदार जाधव यांनी मार्च २०२२ च्या अधिवेशनात साखरीआगर जेटीबाबत आक्रमक भूमिका घेतली. या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख, मत्स्य व्यवसाय आयुक्त, अन्य अधिकारी, आमदार भास्कर जाधव आणि साखरी आगर हेदवी गट मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुती होडेकर व अन्य पदाधिकारी यांची संयुक्त सभा बोलावली. या सभेमध्ये जेटीच्या बांधकामासाठी सुधारित दराने ८ कोटी ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले.