कुडाळमध्ये वाचक स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये 
वाचक स्पर्धा
कुडाळमध्ये वाचक स्पर्धा

कुडाळमध्ये वाचक स्पर्धा

sakal_logo
By

कुडाळमध्ये
वाचक स्पर्धा
कुडाळ ः विजया वामन पाटणकर वाचनालयातर्फे २७ ला सकाळी १० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही एका साहित्यकृतीवर दहा मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. स्पर्धेसाठी प्रथम ५०० रुपये व प्रशस्तिपत्र, द्वितीय ३०० रुपये व प्रशस्तिपत्र, तृतीय २०० रुपये व प्रशस्तिपत्र अशी बक्षिसे आहेत. तालुकास्तरावरील प्रथम तीन विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २६ पर्यंत नावनोंदणी करावी. अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन वाचनालय अध्यक्ष प्रतिभा पाटणकर, कार्यवाह विजय नाईक यांनी केले आहे.
--
कोलगाव कलेश्वरचा
१२ ला जत्रोत्सव
सावंतवाडी ः कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव १२ ला होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कलेश्वरला भरजरी वस्त्र व सुवर्णालंकारांनी सजविण्यात येणार आहे. सकाळी कुळ घराकडून सवाद्य तरंगकाठीसह पालखी निघणार आहे. रात्री ११ वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मध्यरात्री १ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष बाबा राऊळ, सचिव एल. एम. सावंत आणि देवस्थानच्या मानकऱ्यांनी केले आहे.
---
नेरूरमध्ये आज
रक्तदान शिबिर
कुडाळ ः मंजुनाथ फडके मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या (ता. ९) सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मंजुनाथ फडके यांच्या निवासस्थानी, अन्नपूर्णा भोजनालय, नेरूर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
सुनील नाईक
यांना पदोन्नती
वेंगुर्ले ः येथील प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे सहाय्यक अधीक्षक सुनील नाईक यांना कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. डॉ. बाळासहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या आदेशाने ही नियुक्ती केली आहे. सुनील नाईक हे वेंगुर्ले प्रादेशिक फळसंशोधन केंद्रामध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या बढतीबद्दल नाईक यांचे अभिनंदन होत आहे.