दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार
दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat८p४.jpg ः
६१०३३

लांजा ः दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे व पदाधिकारी यांनी मंत्री सामंत यांना निवेदन देत सकारात्मक चर्चा केली.


दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार

लांजा, ता. ८ ः जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच आपल्या स्तरावरील प्रश्न आणि अन्य प्रश्नासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली असल्याची माहिती दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी दिली.
श्री. सामंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. या वेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे व पदाधिकारी यांनी मंत्री सामंत यांना निवेदन देत सकारात्मक चर्चा केली. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये प्रामुख्याने दिव्यांग कर्मचारी पदोन्नती अनुशेष तसेच सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना तातडीने सहाय्यक उपकरणे मिळणे, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता मिळावा, पाच टक्के दिव्यांग निधी समिती स्थापन करणे, जिल्हा बदली झालेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना विनाअट कार्यमुक्त करणे या विषयांवर जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. श्री. सामंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करून समस्या सोडवण्याची सूचना केली. या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य एजाज इब्जी उपस्थित होते.