चौरस आहाराबरोबर वेळ पाळणे महत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौरस आहाराबरोबर वेळ पाळणे महत्वाचे
चौरस आहाराबरोबर वेळ पाळणे महत्वाचे

चौरस आहाराबरोबर वेळ पाळणे महत्वाचे

sakal_logo
By

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat८p१७.jpg
६१०७९

ःराजापूर ः डॉ. संगीता निंबाळकर यांचे शिवराजस्पर्श पुस्तक देऊन स्वागत करताना माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार-ठोसर. या वेळी उपस्थित डॉ. सुयोग परांजपे.


चौरस आहाराबरोबर वेळ पाळणे महत्वाचे

डॉ. संगीता निंबाळकर ; राजापूरला वैद्यकीय तपासणी शिबिर

राजापूर, ता. ८ ः चांगले आरोग्य राखण्यासाठी चौरस आहाराबरोबर आहाराची वेळ पाळणे महत्वाचे आहे. ग्रामीण भारत सक्षम राखण्यासाठी स्त्रियांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील प्रसिद्ध मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर यांनी केले. माय राजापूर आणि मोरया हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात आली.
राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी डॉ. निंबाळकर यांच्यासह माय राजापूरचे अध्यक्ष जगदीश पवार, डॉ. सुयोग परांजपे, सारिका कोळेकर-बकरे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. निंबाळकर म्हणाल्या, पित्ताचा त्रास होणे, अॅपेंडिक्सचा त्रास, हर्निया व पोटातील आतड्याचा त्रास, कॅन्सर असे रोग होऊ नयेत यासाठी आपल्या आहारावर व त्याच्या वेळेवर लक्ष ठेवले पाहिजे. महाराष्ट्रीयन आहार हा चौरस असून सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी हलका आहार व रात्री आठच्या आत रात्रीचे जेवण घेतले पाहिजे. प्रत्येकवेळी आपल्या भुकेपेक्षा दोन घास कमी खाल्ले पाहिजेत. आहारात पुरेशी प्रोटिन, माफक कार्बोहायड्रेट, भरपूर कोशिंबिर किंवा सॅलेड, पालेभाज्या, पुरेसे फायबरयुक्त पदार्थ असतील तर पोटाचे विकार होत नाहीत. माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष पवार-ठोसर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माय राजापूर संस्थेचे सुबोध कोळेकर, संदीप देशपांडे, नित्यानंद पाटील, हृषिकेश कोळेकर, विलास पळसमकर, दत्तप्रसाद सिनकर, प्रकाश परवडे, प्रणोती भोसले, सुधा चव्हाण आदी सदस्यांनी मेहनत घेतली.