सेवाभावी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवाभावी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज
सेवाभावी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज

सेवाभावी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज

sakal_logo
By

61091
बांदा ः डॉ. जगदीश पाटील यांचा गौरव करताना मान्यवरांसह पालकमंत्री चव्हाण.

सेवाभावी अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज

पालकमंत्री रवींद्र चव्हाण ः डॉ. पाटील यांचा बांद्यात सन्मान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी येण्यास नाखुष असतात. पदवी घेऊन मोठ्या महानगरात दवाखाना थाटून सेवा देतात; मात्र ग्रामीण भागात सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉ. जगदीश पाटलांसारखे वैद्यकीय अधिकारी दुर्मिळ आहेत. कोरोना कालावधीत देखील त्यांना तळमळीने काम करताना पाहिले आहे. समाजहित जपणाऱ्या अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्ह्याला नितांत गरज आहे, असे कौतुकोदगार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी डॉ. पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘कोरोनाचे मोठे संकट देशासह राज्यावर देखील होते. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा सामना करत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. मी स्वतः त्यावेळी बांदा केंद्रात येऊन डॉ. पाटील यांचे काम बघितले होते. त्यांनी कोरोना काळातही उत्तम आरोग्य सेवा रुग्णांना दिली. सेवाभावी वृत्तीने काम कसे करावे, याचे आदर्श उदाहरण डॉ. पाटील आहेत. टेलिमेडिसिन हेल्थ किटचा वापर ग्रामीण भागातील जास्तीत जास्त रुग्णांसाठी करावा. यासाठी या उपचार यंत्रणेबाबत जागृतीची गरज आहे."