सोनुर्ली माउली जत्रोत्सवास सावंतवाडीतून जादा एसटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनुर्ली माउली जत्रोत्सवास
सावंतवाडीतून जादा एसटी
सोनुर्ली माउली जत्रोत्सवास सावंतवाडीतून जादा एसटी

सोनुर्ली माउली जत्रोत्सवास सावंतवाडीतून जादा एसटी

sakal_logo
By

सोनुर्ली माउली जत्रोत्सवास
सावंतवाडीतून जादा एसटी
सावंतवाडी, ता. ८ ः सोनुर्ली (ता.सावंतवाडी) येथील प्रसिद्ध श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ९) होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगाराने जादा एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. सावंतवाडी बसस्थानकासह मळगाव व बांदा येथून सोनुर्ली जत्रोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी केले आहे.
सोनुर्ली जत्रोत्सवास राज्यातून हजारो भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येतात. भाविकांच्या सोईसाठी आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी आगारातून १२ जादा गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील दोन गाड्या बांदा बसस्थानक, तर एक गाडी मळगाव येथून सोडण्यात येणार आहे. सोनुर्ली येथे एसटी आगाराचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष व कर्मचारी वर्ग ठेवण्यात येणार आहेत. भाविकांच्या गर्दीनुसार आणखीही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी बसस्थानकातून गोवा येथे जाणाऱ्या बसच्या प्लॅटफॉर्मवरून सोनुर्ली जत्रोत्सव जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक बोधे यांनी केले आहे.