रत्नागिरी-मंदी सरली, पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मंदी सरली, पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस
रत्नागिरी-मंदी सरली, पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस

रत्नागिरी-मंदी सरली, पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस

sakal_logo
By

rat८p२४.jpg-
६११०९
गणपतीपुळेः सुट्टीचा आनंद घेण्यासाठी किनाऱ्यावर फिरायला आलेले पर्यटक.
rat८p२५.jpg-
६१११०
गणपतीपुळेः बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक.
rat८p२६.jpg-
६११११
गणपतीपुळेः पर्यटकांच्या प्रतिक्षेत असलेले बोटचालक. (छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)

पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस
गणपतीपुळेत रोज १५ हजार पर्यटक ; दिवाळी सुट्टी पथ्थ्यावर
रत्नागिरी, ता. ८ ः मंदीचा फटका पर्यटन व्यवसायाला बसेल अशी भिती व्यक्त केली जात होती; मात्र दोन वर्षानंतर यंदा दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळेसह किनारी भागातील पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून गणपतीपुळेत दररोज १५ हजाराहून अधिक पर्यटक हजेरी लावत होते. अजून चार दिवस पर्यटकांची गर्दी राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे टाळेबंदी होती. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सुरक्षित पर्यटन स्थळांकडे फिरणार्‍यांचा ओढा होता. त्यात कोकणातील ठिकाणांकडील ओघ कमी बसला.
२०२२ च्या सुरवातीला कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्बंध बाजूला हटविण्यात आले. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले, वेतन घटले तर काहींचे व्यवसाय बंद पडले. आर्थिक घडी बसवण्यात गुंतलेल्या लोकांचा पर्यटनाकडील ओघ कमी होईल अशी चिंता होती; मात्र यंदा दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांची संख्या पाहता मंदीमधून लोकं सावरत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीचे पहिले तिन दिवस झाल्यानंतर साधारणपणे २७ ऑक्टोंबरनंतर पर्यटन स्थळांवरील गर्दी वाढू लागली. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, दापोलीतील मुरुड, कर्देसह गुहागर किनारी पर्यटकांचा राबता अधिक होता. गणपतीपुळेत दिवसाला १५ हजाराहून अधिक पर्यटकांनी मंदिरात हजेरी लावल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. किनारी भागात शहाळे विक्रेते, फेरीवाले, उंट-घोडे सवारी, बोटींग सवारी, दुचाकी सवारी यासह हॉटेल, टपरी व्यावसायिकांना याचा फायदा झाला. गणपतीपुळेत मुंबई, पुणे यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून अधिक जणं फिरण्यासाठी दाखल झाले होते. येणारा पर्यटक रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात फिरण्याचे नियोजन करुन येत असल्याचे दिसत होते. सर्वसाधारणपणे दररोज दहा ते पंधरा लाखापेक्षाही अधिक उलाढाल गेल्या दहा दिवसात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोमवारपासून (ता. ७) गर्दी कमी झाली असली तरीही १२ तारेखपर्यंत आठ ते दहा हजार पर्यटक हजेरी लावतील असे स्थानिकांचे मत आहे.
-------------
कोट
कोरोनानंतरच्या दोन वर्षानंतरची दिवाळी पर्यटन व्यावसायिकांसाठी समाधानाकारक आहे. पर्यटक गणपतीपुळेत निवास करत होता आणि पुढे जात होता. त्याचा फायदा झाला आहे. कोरोनातील नुकसान भरुन काढण्यास मदत होईल अशी आशा आहे.
- प्रमोद केळकर, लॉजिंग व्यावसायिक
------------
चौकट
जीवरक्षक, बोटींगवाल्याची करडी नजर
दरदिवशी पर्यटकांची गर्दी असली तरीही सतर्क जीवरक्षकांमुळे मोठी दुर्घटना घडलेली नाही. समुद्रात खोल कुणी पोहण्यास गेलाच तर त्यावर जेट स्की किंवा फेरीबोट चालकांचे कायम लक्ष होते. वातावरणही कोरडे असल्याने समुद्र शांत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सुट्टीत अनुचित प्रकारांवर अंकुश बसला होता.