स्वामी समर्थ कलंबिस्त मंडळ भजनात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी समर्थ कलंबिस्त मंडळ भजनात प्रथम
स्वामी समर्थ कलंबिस्त मंडळ भजनात प्रथम

स्वामी समर्थ कलंबिस्त मंडळ भजनात प्रथम

sakal_logo
By

61161
माजगाव ः विजेत्या कलंबिस्त मंडळाला गौरविताना प्रताप सावंत, रुद्राजी भालेकर आदी.

स्वामी समर्थ कलंबिस्त मंडळ भजनात प्रथम

माजगावातील स्पर्धा; ‘पाडलोस रवळनाथ’ द्वितीय, ‘वैभववाडी दत्तकृपा’ तृतीय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ८ ः माजगाव येथील ब्राह्मण मंदिरात खालची आळीकर सावंत-भोसले कुटुंबीयांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे एकादशी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या खुल्या भजन स्पर्धेत कलंबिस्त येथील श्री स्वामी समर्थ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. पाडलोस रवळनाथ मंडळ द्वितीय, तर वैभववाडी दत्तकृपा मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत मणेरी येथील स्वराभिषेक भजन मंडळाची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली. वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक-अजित गावडे (पाडलोस), तबला-रामचंद्र राऊळ (कोलगाव), पखवाज-प्रथमेश राऊळ (न्हावेली), झांज-किरण खडपकर (कारीवडे), हार्मोनियम-समीर नाईक (मणेरी), कोरस-समाधीपुरुष प्रासादिक मळगाव.
स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेमसावंत भोसले, संजय माजगावकर, अॅड. शामराव सावंत, अॅड. संभाजी सावंत, दाजी सावंत, रुद्राजी भालेकर, उमेश सावंत, संदीप सावंत, दीपराज सावंत, गोविंद मेस्त्री, रोहन माडखोलकर, यशवंत सावंत, किशोर सावंत, नरेश सावंत, महेश सावंत, विनोद सावंत, गुरुनाथ सावंत, विजय मेस्त्री, मंगेश सावंत, सूरज सावंत, राज सावंत, अरविंद वराडकर, आदी उपस्थित होते.
परीक्षक म्हणून दया मेस्त्री, शहाजान शेख यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी निखिल सूर्यवंशी, देशपांडे, प्रमोद माजगावकर, ग्रामपुरोहित सचिन माजगावकर आदींनी पारितोषिके पुरस्कृत केली होती. पारितोषिक वितरण प्रताप सावंत, रुद्राजी भालेकर, गुरुनाथ सावंत, विजय मेस्त्री, रामचंद्र सावंत, कुणाल सावंत, मंथन सावंत, अनिकेत सावंत, रामकृष्ण सावंत, नरेश सावंत, मंगेश सावंत, सुभाष सावंत, प्रकाश सावंत आदींसह खालची आळीकर सावंत-भोसले कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्यात आले.