जत्रोत्सवासाठी सोनुर्ली सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जत्रोत्सवासाठी सोनुर्ली सज्ज
जत्रोत्सवासाठी सोनुर्ली सज्ज

जत्रोत्सवासाठी सोनुर्ली सज्ज

sakal_logo
By

६१११६

टीपः swt81.jpg मध्ये फोटो आहे.

जत्रोत्सवासाठी सोनुर्ली सज्ज
आज सोहळा ः नवस फेडण्यासाठी होणार गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर असलेल्या सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी उद्या (ता. ९) सोनुर्ली नगरीत भक्तांची मांदियाळी उसळणार आहे. भक्तांना सकाळी सातपासून देवीचे दर्शन खुले केले जाणार असून तसे नियोजन देवस्थान कमिटीकडून करण्यात आल्याचे प्रमुख मानकरी बाळा गावकर यांनी सांगितले.
तालुक्यातील सोनुर्ली गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचा वार्षिकोत्सव उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ते नियोजन पोलिस प्रशासन व देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून या जत्रोत्सवाची ख्याती आहे. दरवर्षी राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. एक प्रकारे भक्तांची मांदियाळी जत्रोत्सवादिवशी सोनुर्लीमध्ये पाहायला मिळते. लोटांगणाचा जत्रोत्सव म्हणून या जत्रेची प्रसिद्धी आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून दरवर्षी देवीकडे असंख्य नवस केले जातात. हे नवस लोटांगण आणि तुलाभार अशा रुपाने फेडले जातात. जत्रोत्सवाला होणारी गर्दी, वाहनांची संख्या पाहता पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जत्रोत्सवात भक्तांना देवीचे दर्शन सुलभरीत्या घेता यावे, रांगेत राहणाऱ्या भक्तांना उन्हाचा फटका बसू नये, यासाठी देवस्थान कमिटीकडून मंदिर परिसरात मंडप उभारले आहेत.

कोट
स्वयंसेवकांद्वारे भक्तांना योग्यरीत्या रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जत्रोत्सवादिवशी देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर सकाळी सातपासून देवीचे दर्शन खुले करुन ओटी भरणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रम सुरू होणार आहेत.
- बाळा गावकर, मानकरी, देवस्थान कमिटी

जत्रोत्सवात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडवू नये, यासाठी पोलिसांकडून योग्य ती निगराणी ठेवण्यात येणार आहे.
- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी