टुडे पान एक-चिंदर गावची 18 पासून गावपळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-चिंदर गावची
18 पासून गावपळण
टुडे पान एक-चिंदर गावची 18 पासून गावपळण

टुडे पान एक-चिंदर गावची 18 पासून गावपळण

sakal_logo
By

टुडे पान एक

चिंदर गावची
१८ पासून गावपळण
सकाळ वृत्तसेवा
आचरा ः बहुचर्चित चिंदर गावची गावपळण १८ पासून सुरू होत आहे. आज सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने गावपळण १८ पासून होणार असल्याची माहिती मानकरी आणि पोलिस पाटील दिनेश पाताडे, भाई तावडे यांनी दिली.
चार ते पाच हजार वस्तीच्या गावात प्राचीन काळापासून दर तीन ते पाच वर्षांनी गावपळणीची प्रथा पाळली जात आहे. मागील काळात २०१८ ला गावपण झाली होती. यंदाचे वर्ष गावपळणीचे असल्याने प्रथेप्रमाणे आज बारा-पाच मानकरी जमून श्री देव रवळनाथाला कौल प्रसाद घेतला. देवाचा कौल झाल्यावर तारीख निश्चित करण्यात आली. १८ ते २१ पर्यंत संपूर्ण गावातील माणसे तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी वेशीबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात वस्ती करून राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण चिंदर निर्मनुष्य होणार आहे आणि गजबज वाढणार आहे, ती गावच्या वेशीबाहेर. मुंबईतील चाकरमानीही या गावपळणीत मोठ्या संख्येने सहभागी होतात.