श्री कुडाळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री कुडाळेश्वर मंदिरात 
त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात
श्री कुडाळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

श्री कुडाळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

sakal_logo
By

61143
कुडाळ ः श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त केलेल्या दीपोत्सवामुळे उजळून निघालेला मंदिर परिसर. (छायाचित्र ः अजय सावंत)

श्री कुडाळेश्वर मंदिरात
त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

कुडाळ,ता.७ ः कुडाळ- प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर कुडाळ येथे पारंपारिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात सोमवारी सांयकांळी साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात व मंदिर परिसरात केलेल्या दीपोत्सवामुळे परिसर उजळून निघाला.
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी श्री देव कुडाळेश्वर मंदीरात साजरा केला जातो. या वर्षी ही सोमवारी सांयकांळी उशीरा मंदिरात व मंदिर परिसरात सर्वत्र रांगोळी काढुन रंगोत्सव तर दीपोत्सव करण्यात आला. यानंतर महादीप प्रज्वलन करून दीपस्तंभावर महादिप चढविण्यात आला. हा नयनरम्य देखावा पहाण्यासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ निर्मित ऑर्केस्ट्रा ‘स्वरगंधार’ सादर करण्यात आला. यामध्ये श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या लहान-मोठ्या कलाकारांचा व वाद्यवृंदाच्या संचामध्ये हिंदी - मराठी गीतांचा कार्यक्रम रात्री नऊपर्यंत सादर करण्यात आला.