बंद अवस्थेतील चंद्रावती नौकेला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद अवस्थेतील चंद्रावती नौकेला आग
बंद अवस्थेतील चंद्रावती नौकेला आग

बंद अवस्थेतील चंद्रावती नौकेला आग

sakal_logo
By

बंद अवस्थेतील
चंद्रावती नौकेला आग
दाभोळः आंजर्ले खाडीत इरफानिया मोहल्ल्यालगत २ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या चंद्रावती या ६ सिलिंडर नौकेला शनिवारी रात्री आग लागली. यात बोट पूर्ण जळून खाक झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आणल्याने बाजूला असलेल्या इतर नौका सुरक्षित राहून मोठी दुर्घटना टळली. हर्णै बंदरात जेटी नसल्यामुळे आंजर्ले खाडीकिनारी अनेक मासेमारी नौका डागडुजीसाठी आणल्या जातात. यापैकी काही नौका बंद अवस्थेत याच ठिकाणी ठेवण्यात येतात. अशाच नयन पावसे यांच्या चंद्रावती या बंद नौकेला शनिवारी रात्री आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केलेले पाहून इरफानिया मोहल्ला व जुईकर मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
-------
व्यवसाय परीक्षेचे
वेळापत्रक जाहीर
रत्नागिरीः अखिल भारतीय व्यवसाय पुरवणी परीक्षा नोव्हेंबर २०२२ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सत्र २०१४ ते २२ (वार्षिक व सत्र पद्धती) मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे. प्रशिक्षणार्थांनी ऑनलाइन परीक्षा अर्ज व परीक्षाशुल्क भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे कळवले आहे.
-------
उन्हवरे-पांगारी
रस्ता काम रखडले
दाभोळ ः दापोली तालुक्यातील उन्हवरे मुख्य रस्ता ते जाधववाडी पांगारी मोहल्ला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर होऊन तीन वर्षांपूर्वी या योजनेचे युद्धपातळीवर काम चालू झाले होते; परंतु हे काम अपूर्णच राहिल्यामुळे व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासकीय कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. हा रस्ता हा खाडीपट्ट्यालगत असल्यामुळे दळणवळणाच्यादृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. ५.७०० किमी लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असून यासाठी शासनाकडून तब्बल २ कोटी ५५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामासाठी ३० जानेवारी २०१९ ला प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यामुळे एवढा कालावधी जाऊनसुद्धा रस्त्याचे काम प्रगतीपथावर नसल्यामुळे ठेकेदार व प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.