बदली पात्र शिक्षकांची यादी दोन दिवसात जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदली पात्र शिक्षकांची यादी दोन दिवसात जाहीर
बदली पात्र शिक्षकांची यादी दोन दिवसात जाहीर

बदली पात्र शिक्षकांची यादी दोन दिवसात जाहीर

sakal_logo
By

(पान 5 साठीमेन)

अन्य जिल्ह्यातील गोंधळाचा रत्नागिरीला फटका

प्रक्रियेत अडथळा ; बदली पात्र शिक्षकांची यादी दोन दिवसात जाहीर

रत्नागिरी, ता. 8 ः बदल्यांसाठी पात्र असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची यादी पुढील दोन दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. बदली पोर्टलवर राज्यातील काही जिल्ह्यांची माहिती भरण्यात चालढकलपणा करण्यात आल्यामुळे ही मुदत पुढे गेली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती भरावयाची आहेत.
शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे; परंतु काही जिल्ह्यांकडून दिलेल्या मुदतीमध्ये माहिती भरण्यात विलंब होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ अधिकाऱ्यांची माहिती भरण्यासाठी नियुक्ती केली आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेपूर्वीच काम होत आहे. सध्या जिल्ह्यातील 5 हजार 951 प्राथमिक शिक्षकांपैकी बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांची माहिती पोर्टलवर भरण्याचे काम शनिवारपर्यंत (ता. 7) पूर्ण करावयाचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती एक दिवस आधीच भरली गेली होती. रविवारपर्यंत बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर होईल अशी अपेक्षा होती; पण राज्यातील काही जिल्ह्यांकडून माहिती भरण्यास विलंब झाल्याने यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळेत नोकरी, पाच वर्षे एकाच शाळेत आणि दहा वर्षे एकाच केंद्रात काम करणाऱ्यांचा समावेश करावयाचा आहे. जिल्ह्यातील 25 टक्के शिक्षक बदल्यांसाठी पात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांमध्ये नाराजी

दिवाळी सुट्टी संपली तरीही बदल्यांची प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक सत्र सुरू असतानाच बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागू शकते.